Bluepad | Bluepad
Bluepad
माणूस दुरावतोय माणसाला (जागतिक कुटुंब दिना निम्मित)
Sangieta Devkar
Sangieta Devkar
15th May, 2022

Share

पूर्वी प्रत्येक घर माणसांनी,मुलांनी भरलेले नंदनवन असायचे. त्या घरात कित्येक नात्याची प्रेमळ गुंफन असायची. प्रत्येक जण प्रेमाच्या,आपलेपणाच्या गोड बंधनाने बांधलेला असायचा. पण जसजसे शहरीकरणाचे,जागतिकी करणाचे वारे वाहू लागले तस तसे माणसांचे आणि पर्यायाने वस्तूंचे ,स्वतःच्या गरजांचे विकेंद्रीकरण होऊ लागले.जो तो स्वतः पुरता विचार करू लागला. मी आणि माझे कुटुंब असे मर्यादित जगणे जगू लागला. प्रत्येका कडे आर्थिक सुबत्ता मुबलक प्रमाणात आली. त्यामुळे चंगळवाद आणि भौतिक सुख सोयी च्या फेऱ्यात जो तो अडकला. माणसांना माणसांची गरज उरली नाही. माणसाची जागा आता यंत्रांनी घेतली आहे. प्रत्येकाने आपली हर एक सोय करून घेतली आहे त्या जोगे दुसऱ्या कडे हात पसरायला लागू नये. जो तो आपला अहंकार आणि प्रतिष्ठा कुरवाळत बसला आहे. याला अपवाद ही असू शकतात. एकाच शहरात दोन दोन घरे, दोन चार गाड्या यावर आजकाल पत ठरली जाते.पण या भौतिक सुखापायी माणूस खरच सुखी समाधानी आहे का? एकटा मर्यादित कुटूंबा सोबत आनंदी आहे का?
आज "हम दो हमारे दो किंवा एकच" या सूत्रा प्रमाणे आयुष्य सुरू आहे. या मर्यादित त्रिकोणी/चौकोनी कुटूंबात इतर नातेवाईकांना कवचित स्थान असते. मात्र अद्यावत यंत्रे आणि वस्तू यांना मनाचे स्थान मिळते. माणूस हा खर तर समाजप्रिय प्राणी आहे मग तो माणसा पासून खरच अलिप्त राहू शकतो का? प्रत्येकाला आपले मन मोकळे करायला ,सुख दुःखात सहभागी व्हायला जवळचे नातेवाईक ,मित्र,मैत्रिणी यांचीच गरज भासते पण आज प्रत्येक जण या सर्वां पासून खूप दुरावत चालला आहे. याला अपवाद ही आहेत. नातवंडांना सांभाळण्या साठी ,त्यांची प्रेमाने काळजी घेण्यासाठी आजी आजोबा हवेतच. शेजारच्या फ्लॅट मधील एखाद्याला आपल्या मदतीची गरज भासू शकते पण फ्लॅटच्या दरवाज्या सारखे आपल्या मनाचे ही दरवाजे बंद करून बसलो आहोत का? माणसाची संकुचित वृत्ती वाढत चालली आहे,हेच संस्कार नकळतपणे मुलांवर ही होत आहेत. आज माणूस माणसा पासून,समाजा पासून दूर जात आहे. पैसा हाच सर्वश्रेष्ठ अस मानले जात आहे. प्रेम,जिव्हाळा,नाती गोती यांचे महत्त्व कमी होत आहे. नाती,कुटुंब यांचे महत्त्व येणाऱ्या पिढीला नाही समजवून सांगितले तर समाज आणि एकूण देश विखुरण्यास वेळ लागणार नाही. विखुरलेल्या पिढीला सांभाळायला,घडवायला नातीच कमी येतात. प्रत्येक नात्याचा रंग वेगळा असतो तेव्हा ते नाते संबंध टिकवणे,फुलवणे आणि नात्यांचे भावबंध घट्ट पकडून ठेवणे ही काळाची गरज आहे. माणसातील माणुसकी जीवन्त ठेवणे हे आपलेच काम आहे. याची सुरुवात आपल्याच घरा पासून व्हायला हवी. नात्याचा आदर,त्यांचे महत्त्व हे मुलांना पटवून द्यायला हवे,त्या साठी आवश्यक आहे थोडा संयम,थोडी तडजोड आणि भरपूर प्रेम! नाहीतर येणाऱ्या पिढीला दाखवायला देखील मामा, काका,आजी आजोबा ही नाती अस्तित्वात असणार नाहीत.
समाप्त

206 

Share


Sangieta Devkar
Written by
Sangieta Devkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad