Bluepad | Bluepad
Bluepad
सख्य भक्ती द्रौपदीची
डाॕ.वैशाली कासार
डाॕ.वैशाली कासार
15th May, 2022

Share

सख्य भक्ती म्हंटले की सगळे अर्जुनाविषयी भरभरून बोलतात पण तीच सख्य भक्ती द्रौपदीनेहि केली हे सर्व विसरतात.
अर्जुनाची व कृष्णाची मैत्री खरं तर नात्यातून झाली कारण ते आत्ते-मामै भावंडे . द्रौपदी व कृष्णाची मैत्री ओळखितून झाली व पूढे नात्यांमध्ये सूध्दा रूंपातरीत झाली.
द्रौपदी द्रूपद राजाच्या मूलींविषयीच्या तिरस्कार भावनेला बळी पडून जेव्हा नगरातून हद्दपार झालेली तेव्हा तिला प्रथमतः कृष्ण भेटला. कृष्णाने तर तिथेच तिला आपली जिवाभावाची सखी मानली व लगेच आपली मैत्रीहि निभवून दाखविली. कृष्णाने केलेल्या आक्रमणात द्रूपद राजाचे समस्त सैन्य दृष्टंद्दूमन्यसहित जारबंदी झाले आणी कृष्णाचि कौमोदकि नामक गदा द्रूपदाच्या माथी पडणार तोच आपल्या तेजाने द्रौपदीने तिसं थोपविले, जेणेकरून ती द्रूपदाचि लाडकी कन्या व श्रीकृष्णाची प्रियसखी झाली. द्रौपदीलाही जाणीव झाली की कृष्ण हा सामान्य नसून परमात्मा आहे व आपला खरा मित्र आहे. तेव्हापासून तो तिला सखी म्हणूनच संबोधू लागला.
कृष्णाने खरी निखळ मैत्री द्रौपदी सोबत करून वेळोवेळी तिला मार्गदर्शन करून, रक्षण करून वाचविले.
द्रौपदीचा भर सभेत अपमान झाला. समस्त कूरूसभेत ती प्रत्येकास मदतीसाठी साद घालून थकली. पाच विश्वविजेते वीर पांडव सूध्दा खाली मान घालून बसले व आशा आसहाय परिस्थितीत तिने आपली सख्य भक्ती पणाला लावली व वर हात जोडून ती ठाम उभी राहिली. कित्ती ती दृढश्रध्दा व दृढभक्ती!
पूढील काही क्षणात आपण विवस्त्र होऊ हि भिती नव्हती कारण तिचा आपल्या सख्यावर पूर्ण विश्वास होता की तोच माझी लाज राखू शकतो. तिची वस्त्रे खेचून खेचून दुःशासन निश्चेष्ठ पडला, सभेत वस्त्रांचा ढीगच ढीग साचला पण डोळे बंद करून अनन्यपणे आपल्या परमात्म्यास शरण गेलेल्या द्रौपदीचे लज्जारक्षण झाले.
यानंतर त्या भयंकर अपमानाने क्रोधित झालेली, कदापी न विसरता येणाऱ्या त्या प्रसंगाने व्यथित झालेली द्रौपदी, जी अग्निकूंडात जन्मली ती स्वतःच्या आत अपमानाचे आग्निकूंड घेऊन, जेव्हा आपल्या महालात स्वतःच्या कक्षात कोंडून बसली. तेव्हा कोणीही कक्षाची कवाडे उघडू शकले नाहीत किंवा तोडू शकले नाहीत, अगदी भीमाची शक्ती सुध्दा कमी पडली. कारण तो दरवाजा तिच्या मनाच्या संकल्पाने बंद झाला होता.अशा वेळी कृष्ण तेथे येतो त्याचे नयनकटाक्षेमात्र तो दरवाजा थोडासा उघडतो आणि कृष्ण अंधारात नैराश्याने घेरलेली, आपमानाने अतीव पीडीत द्रौपदी बसलेल्या कक्षात येतो व तिला हाक मारतो. ती म्हणते हे गोविंद आलास तसा परत जा मी मली झाले आहे माझ्याजवळ येऊ नकोस. त्यावर तो म्हणतो सखी, मित्रांजवळ आपले दुःख मोकळेपणाने व्यक्त करावे म्हणजे दुःखाने होणाऱ्या वेदना कमी होतात. तुझ्या दुःखात, वेदनेत एक मित्र म्हणून मी सहभागी आहे, मला पण एक मित्र म्हणून तूझी पीडा भोगू दे. आणि मलीनतेचं म्हणशील तर गंगेच्या पाण्यात रोज लाखो लोकं पाप धूण्यासाठी येतात पण म्हणून गंगा पतित होत नाही ती सदैव शूध्दच रहाते. तसेच तूझा अपमान करणारे पापभावनेने आले होते पण त्यांचेमूळे तूझ्या शूध्दतेत किंवा पूण्यांत काही फरक होत नाही.
तिच्या अंधकारलेल्या मनात तो ज्ञानदीप लावतो व समजावतो. समस्त विश्वाचा विचार करायला शिकवतो. जर द्रौपदी सारख्या सम्राज्ञीला हे अधर्मी इतके छळू शकता तर सामान्य स्त्रीवर किती अत्याचार करतील यावर विचार करण्यास भाग पाडतो.
यूध्दापूर्वीच तो द्रौपदीला भविष्यात काय घडेल याची कल्पना देतो त्याबरोबरच जीवनाचे रहस्य तिला युक्तीने मार्मिकतेने पटवून देतो.
तिच्या या सख्य भक्तीने ती स्वतःला कणखर करू शकली. नाहीतर कोणती आई होणाऱ्या युध्दात आपल्या मूलांचा मृत्यु होणार हे जाणल्यावर युध्दाला तयार होईल? पण द्रौपदीने हे सर्व निभवले ते फक्त आपल्या निष्काम सख्य भक्तीने !

239 

Share


डाॕ.वैशाली कासार
Written by
डाॕ.वैशाली कासार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad