Bluepad | Bluepad
Bluepad
कुटुंबाचं महत्व सांगणारे ‘हे’ आहेत सुंदर विचार…
N
Nehal Karade
15th May, 2022

Share

आज १५ मे आहे. आज दिवस खास आहे. कारण विश्व कुटुंब दिवस आहे. म्हणून कुटुंब खूप महत्त्वाचं आहे हे सांगणारे सुंदर विचार आपल्यासाठी संकलित केले आहेत.
 • अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम्।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्॥
अर्थ : हे माझे आहे, ते परक्याचे आहे, असा विचार संकुचित मनोवृत्तीचे लोक करतात. पण ज्यांचं व्यक्तिमत्व, ज्यांची विचारसरणी मोठी आहे, ते संपूर्ण विश्वालाच आपले घर मानतात.
 • सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया,
सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चिद् दुःख भाग्भवेत् ।
ओम शांतीः शांतीः शांतीः||
अर्थ : सर्व सुखी होवोत, सर्व निरोगी राहोत, सर्वांचे कल्याण होवो, कुणालाही दुःख होऊ नये. या श्लोकामध्ये केवळ आपले कुटुंब, आपली जात, आपला समाज असा संकुचित विचार नसून साऱ्या विश्वातील जीवांचा विचार करण्यात आला आहे. सर्वांचे सुख चिंतण्यात आले आहे.


कुटुंबाचं महत्व सांगणारे ‘हे’ आहेत सुंदर विचार…

 • तुम्ही तुमच्या कुटुंबाची निवड करू शकत नाही. कारण देवाकडून तुम्हाला मिळालेली भेट आहे आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाला मिळालेली भेट आहात.
 • जो बंध आपल्या कुटुंबाला जोडून ठेवतो, तो केवळ रक्ताच्या नात्यांचा नसतो. त्याहूनही जास्त नात्यांमधील असणारा एकमेकांबद्दलचा आदर, एकत्र राहून मिळवलेला आनंद; हा असतो.
 • घरी जाणं, कुटुंबासोबत एकत्र जेवण करणं आणि मस्त विश्रांती घेणं यासारखं दुसरं सुख नाही.
 • एका आठवड्याचे असतात सात वार. आठवा परिवार, तो नीट असेल तर सातही वार कायमच सुखाचे जातील.
 • कुटुंब घड्याळाच्या काट्याप्रमाणे असावं. कोणी मोठं तर कोणी लहान असावं. कोणी जलद तर कोणी सावकाश चालावं. पण कुणाचेही बारा वाजणार असतील, तर सर्वांनी एकत्र यावं.
 • योग्य संस्कार हे कोणत्याही मॉलमध्ये नाही तर एका चांगल्या कुटुंबात मिळतात.
 • ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे पण एकत्र कुटुंब हे जीवनाचे मूळ आहे.
 • घरात एकत्र राहणं म्हणजे कुटुंब नाही. एकत्रित जगणं आणि सगळ्यांची पर्वा करणं म्हणजे कुटुंब.
 • एक आनंदी कुटुंब हे स्वर्गासमान असतं. तुम्ही गुलाब असाल, तर कुटुंब एक पुष्पगुच्छ आहे, ज्यात तुम्ही सुरक्षित आहात.
 • आयुष्यात आपण अनेक गोष्टी बदलतो पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत आयुष्यात कुटुंब कधीच बदलत नाही.
 • कुटुंब आपल्या भूतकाळाशी काल्पनिकरित्या जोडलेलं असतं तर भविष्याकडे नेणाऱ्या एखाद्या पुलासारखं असतं.
 • घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा. पण घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे एक कुटुंब आहे.
 • कोणाचे मित्र असतात, कोणाचे कुटुंब असते. कोणाकडे असे मित्र असतात जे त्यांचे कुटुंब असते.
 • ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे. परंतु एकटा कुटुंब हे जीवनाचे मूळ आहे.

यापुढे कोणत्याही परिस्थितीत कायमच आपण आपल्या कुटुंबासोबत राहू, आज ही खूणगाठ मनाशी बांधूया. सर्वांना जागतिक कुटुंब दिनाच्या शुभेच्छा !.!.!

523 

Share


N
Written by
Nehal Karade

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad