Bluepad | Bluepad
Bluepad
माझ्या आठवणीतले आजोबा.....
Vilas Thakur
Vilas Thakur
15th May, 2022

Share

आजोबा म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते एक रुबाबदार व्यक्तिमत्व.
डोक्यावर गांधी टोपी किंवा फेटा सफेद भरगच्च मिशा हट्टीकट्टी देहयष्टी अंगावर सफेद तलम मखमली सदरा आणि सफेद धोतर त्या धोतराचा सोगा ( टोक )एका हातात पकडून चाललेले असे हे आजोबा अजूनही मला आठवतात. माझे आजोबा सुशिक्षित होते आणि ते त्यावेळी आर्मी मध्ये जॉबला होते आर्मीची सर्व्हिस ही फक्त पंधरा वर्षांची असते आणि त्यानंतर त्यांना पोलीस प्रशासनात त्यांची इच्छा असेल तर घेतले जाते.
तर माझे आजोबा हे आर्मीनंतर पोलीस सेवेत रुजू झाले. त्यांचा तो युनिफॉर्म मधला रुवाब अजूनही मला जशाचातसा मला आठवतो.
आजोबा हे कडक स्वभावाचे असतात रूढ वागतात असं काहीसं बोललं जातं पण माझ्या बाबतीत ते उलट होतं माझे आजोबा घरी आले की एकदम मवाळ असत कारण त्यांचा स्वभावच मुळात मवाल मितभाषी होता. अशा या आजोबांच्या सानिध्यात मी जास्त काळ राहिलो नाही कारण माझे आजोबा हे माझ्या लहानपणीच अटॅक ने देवाघरी गेले.
🙏🙏आता राहिल्या फक्त त्यांच्या आठवणी 🙏🙏
माझ्या आठवणीतले आजोबा.....

181 

Share


Vilas Thakur
Written by
Vilas Thakur

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad