आपला भारत देश एक सुसंस्कृत लोकशाही देश म्हणून जगात गणला जातो. देशाचा लोकसंख्येत जरी जगात चौथा क्रमांक लागत असला तरी आपला देश हा एक सुखी गुणसम्पन्न देश समजला जातो.
पण एक प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे स्त्री सुरक्षित्तेचा तर तिथे आपल्या देशात ही प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं. याचं कारण म्हणजे आपल्या देशात ही स्त्री पाहिजे तेवढी सुरक्षित नाही आहे.
आपले कायदे हे तकलादू आहेत. त्याचा फायदा गुन्हेगार घेतात आणि कायद्याच्या कचाट्यातून पळ काढतात आपल्या देशात कायद्याला पळवाटा खूप आहेत यांचा फायदा गुन्हेगारांना होतो.
स्त्री सुरक्षितता म्हणजे काय तर स्त्रीवर होणारे अत्याचार हे थांबले पाहिजेत एका ठिकाणी आपण स्त्रीला आई बहीण समजतो आणि अंधाऱ्या ठिकाणी तिच्या भाबळेपणाचा फायदा घेऊ पाहतो हे चुकीचं आहे.
हुंडाबळी ही जवलंत समस्या आपल्या भारत देशात अजूनही प्रचलित आहे आपला कायदा सांगतो की हुंडा देणे व हुंडा घेणे दोन्हीही अनैतिक आहे पण सरकारचे ऐकतो कोण कायद्याला धाब्यावर मारून हुंड्याची देवाणघेवाण ही होतेच त्यात जर नाराजी दर्शवली गेली की मग हुंडाबळी हे ओघाओघाने आलेच.
आपलं राज्य हे स्त्री सुरक्षा कायद्याचं काटेकोर पालन करतं पण तरीही गुन्हे हे होताना दिसतातच कधी एकतर्फी प्रेमातून हत्या तर कधी ऍसिड फेकून विद्रुप करणं ही विकृती व ही विकृती असणारे विकृत जोवर देशात आहेत तोवर स्त्री सुरक्षित नाही.
विलास ठाकूर
डोंबिवली