Bluepad | Bluepad
Bluepad
छत्री मायेची सावली
डाॕ.वैशाली कासार
डाॕ.वैशाली कासार
15th May, 2022

Share

छत्री ! नीट विचार केला तर किती मार्मिक अर्थ निघतो. पावसाळ्यात जी छत्री आपणांस पावसात ओले होण्यापासून वाचवते तीच छत्री आपल्याला रणरणत्या उन्हात उन्हापासून वाचवते.
आई वडीलांची शिकवणीची छत्री आपल्यावर सूसंस्कारांचे छत्र धरते व आपले पतन होण्यापासून वाचवते.
आजी आजोबांची अनुभवाची छत्री आपल्याला सारासार विचार करायला शिकवते, रीती भाती समजवते व समाजातील तणावांपासून वाचवते.
मामा-मावशीच्या प्रेमाची छत्री आपल्याला आपूलकीची ऊब देते, आधार देते व निराधारपणापासून वाचवते.
मैत्रीची छत्री आपल्याला नेहमीच साथ देते, रणरणते उन असो वा धो धो पडणारा पाऊस असो , किंवा सोसाट्याचे वादळ असो, कोणत्याही परिस्थितीत आपली साथ सोबत सोडत नाही. म्हणून ही नेहमी हवीशी वाटते.
गूरूंच्या शिक्षणाची छत्री आपल्याला सज्ञान बनविते व अज्ञानापासून वाचविते.
सद्गूरूंची बोधाची छत्री आपल्याला जीवनाचा उद्देश दाखविते, धर्म अधर्म शिकविते व अविचारापासून वाचविते. समस्त विश्वावर प्रेम करायला शिकविते.
परमेश्वराची अदृश्य छत्री खरंतर जन्मापासून सोबत असते. तिची जाणीव किंवा स्मरण आपणांस राहिले तर ती भवसागरातून सहिसलामत वाचवून पार करते पण तिचे विस्मरण झाल्यास ती ऊडू जाते व आपल्यालाही उडवून भटकत ठेवते. यासाठी या अदृश्य छत्रीची दांडी आपण दृढश्रध्येने घट्ट धरून ठेवणे आवश्यक असते.
यापैकी छत्री कोणतीहि असली तरी तिला आपण जपणे गरजेचे असते. काम झाले टाकली बाजूला असे करून उपयोग नाही कारण सदैव तिची गरज आपणांस असते.
कूटूंबाची भक्कम छत्री आपल्यावर कायमची छत्रछाया धरते व आयुष्याचा प्रवास सूखकर करते.
छत्री मायेची सावली

183 

Share


डाॕ.वैशाली कासार
Written by
डाॕ.वैशाली कासार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad