Bluepad | Bluepad
Bluepad
देवा घरी जावे पत्र माझे
S
Sushma Paithankar
15th May, 2022

Share

सुषमा पैठणकर,येवला/वडिलांचा आशिर्वाद.
-------------------------------------------------------
_*देवाघरी जावे माझे पत्र*_
_*प्रती*_,
_कै.रामकृष्ण पैठणकर, साहेब_
_येवला ,ता.येवला जि.नाशिक_
_दि.15/5/2022_.
_*विषय*_ ÷ _माझे वडिल कै.रामकृष्ण पैठणकर यांच्या दि.15 फेब्रुवारी रोजी झालेल्या दुःखद निधनावर देवाघरी एक पत्र......_
*_प्रिय,बाबा (डियर पापा)_*
_जाणार कोणी आसेल तर स्वर्गात जावे माझ्या बाबांना माझे पत्र द्यावे जरूर जरूर सांगावे...._
_प्रयत्न लेकीचा एवढाच राहिनं बाबा दर महिन्याला तुमच्या साठी मी चार ओळी तरी लिहिनं_..
_*विरहात बाबा तुमच्या आज तिन महिने झाले* सहवासात तुमच्या आयुष्य माझे गेले तरी ही मन नाही भरले, उरले सुरले सांगायचे बोलायचे राहिले, असे कसे बाबा तुम्ही मला सोडून गेले,_ _*काळ क्रुर नियतीचा होता मी ओरडून ओरडून सांगत होते बाबा* तुम्ही मला हवे होता,_ _डोंगरा एवढे दुःख झाले बाबा जेव्हा तुम्ही हे जग सोडुन गेले_,
_जीवनात माझ्या प्रत्येक क्षण आनंदचा होता बाबा जेव्हा तुम्ही माझ्या सोबत होता,_ _थकले नाही, दमले नाही बाबा माझे_ _परीस्थीतीशी कधी हारले नाही,_ _पडताना मला सावरल संकटातही पुन्हा मला नव्यान ऊभ केल,_हवा होता धाक तुमचा_ _शिस्तीतही होता प्रेमाचा ओलावा,_
_*कष्टाला फळ होते घामालाही*_ _*सुगंध होता बाबा तुमची मुलगी असल्याचा मला अभिमान होता* संस्कारांची शिदोरी बनली,सोबत घालवलेल्या क्षणांची आठवणींनी ओंजळ भरली,_ _पापण्या आड लपलेल्या अश्रुंनी नयने भिजली,_ _*पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला बाबा माझे गेले स्वर्गाला*...._
_पुण्यवान तुम्ही स्वर्गातच रहाणार पत्र माझे व्यर्थ नाही जाणार_
_मुर्ती तुमची दिसणार नाही किर्ती तुमची आम्ही विसरणार नाही...._
_आमच्यासाठी खुप काही करतानां *इतकं दिल, इतकं दिल, घेता घेता, बाबा तुम्हाला Thanku बोलायचचं राहून गेलं....*_
_*THANKS & MISS U PAPA VERY VERY MUCH*_
_भावपूर्ण आदरांजली_
_*बाबा आपलची लाडकी*_
*_सुषमा पैठणकर_*
------------------------------------------------------
_शब्द संकलन_ ÷
_सुषमा पैठणकर ,येवला_.
_9561572497_
_दि.15 मे 2022_
__________________________________
👉🏼 _प्लिज फाॅरवर्ड_ 👉🏼

167 

Share


S
Written by
Sushma Paithankar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad