अर्धवर्तुळाकार अंगकाठीची काळ्या कपड्यातील खात्रीची विश्वासाने हात हातात घेऊन आपल्या मुठीत घट्ट पकडून जबरदस्त आधार देणारी छत्री. ' छत्री माझी नामी येते सर्वा कामी, कशीही फिरवा कशीही मिरवा किंमत रुपये चार ' अशी छत्री काही काळापूर्वी अगदी अल्प किमतीत मिळायची आणि अमूल्य साहाय्य करायची.आज माझ्या छत्रीची किंमत थोडीफार वाढली असली तरी ती आजही भाव खाऊन आहे, तितकाच किंबहुना थोडाफार जास्तच.
पावसापासून रक्षण करण्यासाठी ती आपल्यावर छत्र उभारते, उन्हाळ्यात उन्हाच्या झळा आपल्याला लागू नयेत यासाठी आईच्या ममतेने आपल्या डोईवर पदर धरते. नको असलेला माणूसअगदी आपला बॉस किंवा किराणा दुकानदार, त्याला टाळायचे तर छत्रीला आडवी धरली की काम फत्ते समजा. प्रेयसीला पावसाळा असो की उन्हाळा छत्रीत घेऊन प्रेमळ गुजगोष्टीत रंगलात आणि पुढून तिचा खडूस बाप येतोय. अश्यावेळी तुमच्या या खडूस भावी सासऱ्यापासून आता या क्षणी तर तोंड लपवायला हवे. एक करा दोघांचा चेहरा लपवा या छत्रीत आडवी छत्री धरून टाकायची . खडूस बापाला तुमच्या प्रेमाच्या ताकास तूर लागत नाही.तुमची प्रेमाची डाळ मस्त शिजून जाते ती वेगळीच.सारे काही सुफळ संपूर्ण होऊन जाते.
हल्ली पावसाशिवाय छत्रीला फिरायला नेत नाही कोणी.ज्यांना खरंच जगण्यात चटके बसतातअधून मधून तें छत्री ठेवतात हाताशी .असलेली बरी म्हणून. फार पूर्वी धोतर, शर्ट, काळा किंवा तापकीरी, किरमीजी रंगाचा कोट डोक्यास काळी टोपी आणि खाली धोतर , पायात जाड चपला व्यक्तिमत्वास ओळख द्यायचा भाग होता. घरातली कोपऱ्यातली छत्री चाळीतल्या चारचोघाची ओळख काढत त्त्यांचेबराबर फिरायची. छत्री कधी वेळेला दिसायची नाही. छत्री हरवली तरहृदयाचा तुकडा तुटायचा. छत्री बरोबर आठवणीने घेऊन जाणे, तितक्याच आठवणीने ती विसरून येणे यासारखी मजा नाही. वणवण भटकून अखेर राहतो त्या सोसाययटीच्या गप्पाच्या कट्ट्यावर ती सापडणे हा क्षण किती आंनद देतो म्हणून सांगावा. हजारो रुपयांचीपर्स अचानक सापडली तरी होतं नाही आणि झालाच आनंद तर तो हरवलेली छत्री सापडल्यावर होतो त्यापेक्षा कमीच.
छत्री बरोबर काही वेळा पिढ्या न पिढ्याच्या आठवणी गुंतलेल्या असतात. अत्यवस्थ आसलेल्या घराल्या सदस्यांच्या डोक्यावर प्रथमोपचार.म्हणून छत्र धरून वाचवण्यास मदत केलेली असते. स्वतःच्या जावयाच्या डोक्यावर छत्री धरलेली जाते. जन्मलेल्या घराच्या कुलदीपकावर धरलेली असते. कितीतरी आठवणीने मढलेली छत्री हरवली तर पोलीस तक्रार होण्यासाठी पोलीस स्टेशन ची पायरी चढली जाते.
डोक्यावर काळी टोपी. डोळ्यावर चष्मा जाडभिंगाचा. अंगात सैल असा कोट किरमीजी रंगाचा. लागल्या असाव्यात झळा परिस्थितीच्या आणि रणरणत्या उन्हाच्च्या. अगदी पडलेला चेहरा. पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढून आत आला
.' तक्रार आहे माझी. ' म्हणाला.' नोंदवून घेणार का त्या तक्रारीला.हरवलीय माझी छत्री '
अजीजीने सांगायला लागला. ' मा णसे हरवल्याची तक्रार घेतो छत्री हरवल्याची कशी घेणार ? 'हवालदार त्याला म्हणाला. पाच दहा छत्र्या पडल्यात स्टेशनात घ्या तिच्यातल्या एकीला. तो म्हणाला, ' हवालदार साहेब, छत्री माझी नामीमाझ्यासाठी तिचे मोल खूप हे. हरवलेली कुऱ्हाड लकूड तोड्याला देवाने स्वतः येउन दिली. मीच आलोय तुमच्या कडे माझी छत्री मलाच मिळूवून नाही देणार?माझ्या आयुष्यातल्या उन्हाचा ताप साहेब हिनेच सोसला. जराशीही झळ नाही लागू दिली मला.
प्रश्न त्याचा खरा पण कायद्याच्या कलमाने ' कलम 'की हो केला.
तर असे माझ्या छत्रीचे प्रेमपुराणं !
शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर.