Bluepad | Bluepad
Bluepad
प्रेत आणि सामर्थ्याचं प्रतीक "
आविनाश ढळे
आविनाश ढळे
15th May, 2022

Share

हे छायाचित्र दुसऱ्या महायुद्धातलं (1945) आहे.
प्रेत आणि सामर्थ्याचं प्रतीक "
अमेरिकन फोटोग्राफर "जो ओडोनेलने" १९४५ साली जपानमधील नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ला झाल्यानंतर हे छायाचित्र टिपलं होतं !
जवळपास ८-९ वर्षांचा एक जपानी मुलगा आपल्या वर्षभराच्या लहान भावाचा मृतदेह पाठीवर बांधून त्याच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानात रांगेत उभा होता.
फोटोग्राफर जो ओडोनेलने अशी माहिती दिली की, त्या उभ्या असलेल्या मुलाच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता आणि रडणं टाळण्यासाठी तो आपले ओठ दातांनी जोरजोरात चावत होता. इतक्या जोरात की त्याचे ओठ फाटून त्यातून रक्त यायला लागलं होतं.
जेव्हा तिथे उभ्या असलेल्या एका स्मशानातल्या रक्षकाने त्याला विचारलं..
"ते तुझ्या पाठीवर असलेलं ओझं मी घेतो."
यावर त्याने उत्तर दिलं. "हे कुठलंही सामान किंवा ओझं नाही... हा माझा भाऊ आहे !"
आजही जपानमध्ये हे छायाचित्र
"सामर्थ्याचं प्रतीक "
म्हणून वापरतात.
हा फोटो पाहून मी तर खूपच अस्वस्थ झालो आयुष्याच्या होत्या नव्हत्या त्या अभिलाषा अशावेळी संपुष्टात येतात.
आयुष्य म्हणजे काय हे यातुन सार्थपणे दिसून येते.
©®आविनाश ढळे
एक अश्वस्थामा

171 

Share


आविनाश ढळे
Written by
आविनाश ढळे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad