Bluepad | Bluepad
Bluepad
छत्री नको ...उड जायेगी
प्रतिभा
15th May, 2022

Share

मी बाई छत्री हो स्त्री
म्हणून तर देखणे रूप घेवून निरनिराळ्या ठिकाणी निदान दोन ऋतु मध्ये तरी दिसते.
काळा हा तर माझा आवडता रंग
कारण पुरुषांना तोच आवडतो व त्यांनी माझा उपयोग केला की कशी जिरवली असा काही तरी फील येतो.म्हणजे माझ्याशिवाय यांना पर्याय नाही.,,, ह्या ..ह्या.
आता नवं नवीन रंगात नवीन रुपात नवीन ढंगात मी उपलब्ध असतेच.
छोट्यांसाठी छोटीशी नाजूक त्यात पण मुलांसाठी स्पायडर मॅन किंवा पोकेमान ..डोनाल्ड डक..अशी काही विविध कार्टून्स चे डिझाईन घेवून अवतरते.
व छोट्या मुलींसाठी सिंड्रेल्ला किंवा बार्बी परीराणी..नाजूक साजूक फुले...गुलाबी आकाशी अशा. एकदम गर्लिष स्टाईल मध्ये असते.
आता यंग मुलांसाठी तर. एकदम फंकी
व यंग मुलींसाठी पण स्वप्नांच्या राज्यात घेवून जाणारी मी असते.
बाकी महिला सुद्धा कमी नाहीत हा
आता तर सिंथेटिक पैठणी व खणाची पण कुठे कुठे तर नथ मंगळसुत्र ची नक्षी
हो किंमत मात्र थोडी नाही भलतीच जास्त.
मला माझे रूप पाहून अगदी हवेत तरंगत राहते.
उन्हाळा आणि पावसाळा मध्ये मला वापरतात.
आता ऊन म्हणजे कडक किती भाजायला होते पण काय करणार सेवा करणे माझे काम.
आणि पावसाळा तर त्या अंग अंग भिजवती जलधारा मूळे मोहरुन जाते हरखून जाते.
पण वारा सुटला की तो मात्र धसमुसळपणाने घाबरवतो
वेडाच आहे तो उगीच अंगलट करतो.
मी मात्र मुळीच लक्ष देत नाही त्याच्याकडे.
मग मात्र तो मला उलटी सूलटी करून मोडून पण टाकतो.. आकाशात काय उडवतो ...असा राग येतो ना त्याचा.
थंडी मध्ये मात्र गुपचूप घरातल्या एका कोपऱ्यात पडून असते मी बिचारी धूळ खात कुणाचेच लक्ष नसते माझ्याकडे.
पडून पडून हाडे कमकुवत होतात.म्हणजे तारा हो
कपडे पण कधीतरी उंदीर येवून कुरतडून जातो.
मग काय माझा मालक गरीब असेल तर डागडुजी करतो व मलाच वापरतो.
पण श्रीमंत असेल तर माझ्या सवतीला घेवून येतो.
व मला फेकून देतो.
असो काहीही असो
मला मात्र अशी सेवा करायला आवडते.
बाकी माणसांचे काय ...कित्येक प्रकार.वेगवेगळे स्वभाव.
व्यक्ती तितक्या प्रकृती...अनुभवायला मिळतात.
छत्री नको ...उड जायेगी

188 

Share


Written by
प्रतिभा

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad