Bluepad | Bluepad
Bluepad
मनातली भिंती माणसाला कधीच यशस्वी होवू देत नाही.
l
lavi k
15th May, 2022

Share

मन म्हटलं तर आपल्याला सतत अनेक विचार येत असतात ... आपलं मन काही स्थिर नसते . विचार अनेक एक तर ते आनंदचे असो किंवा दुःखाचे असो , परंतु कोणतेही काम आपल्याला करायचे असले तर त्यावर आपले ठाम मत असलेच पाहिजे नाहीतर ते काम करण्यात काही अर्थ नाही हे खरं . अशा वेळी आपल्या मनामध्ये एक भिंत तयार होते आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होत जातो . ही भिंत कायम नकारात्मक विचार करते . यशस्वी होण्यासाठी मनामध्ये सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे . पण या अशा नकारात्मक विचारांमुळे तसेच गमवलेल्या स्वतः वरच्या विश्वासाला ही भिंत नेहमी पाठिंबा देते परतुं आपण ठरवायचे , कि किती दिवस आपण असे करत राहणार . किती दिवस मागे हटणार . किती दिवस स्वतः मध्ये भिंत तयार करत बसणार . आपल्याला कळत देखील नाही कि आपण कसे या भिंती आड राहतो हि भिंत अडथळा निर्माण करण्याचे कार्य करते व यशस्वी मार्गापर्यंत पोहचू देत नाही. . . . .
मनातली भिंती माणसाला कधीच यशस्वी होवू देत नाही.
मनातली भिंती माणसाला कधीच यशस्वी होवू देत नाही ....मनातली भिंत कायमची दूर करणे आवश्यक आहे हि दूर करण्यासाठी तर पहिली गोष्ट म्हणजे सकारात्मक विचार .... दुसरी म्हणजे आत्मविश्वास वाढवणे ... स्वतः वरती जेवढा विश्वास तेवढंच यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही . यशस्वीची पायरी कितीही कठीण असली तरीही हार मानणे चुकीचे आहे . . .असे वाटेत अनेक काटे येतील पण त्यावरून चालण्याची हिम्मत आपल्यात असली पाहिजे तरच आपण यशस्वी होवू शकतो . अन्यथा नैराश्य हाती येते , कि त्या पासून सावरणे कठीण ... आपल्यापैकी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रस्त होतो . ते काम ऑफिसचे असो वा घरचे आपल्याला त्यात रस असणे आवश्यक असते . त्यामध्ये रस नसेल तर , हि भिंत गंवडी जसे एकावर एक विट लावून भिंत तयार करतात तशीच हि मनामध्ये विटेवर विर ठेवूनच मनातली भिंत तयार होते आणि हे कधी घडून जाते हे आपल्याला जाणवत देखील नाही . त्यामुळेच आपल्या मनामध्ये सकारात्मक विचारांऐवजी नकारात्मक विचार केला जातो . जस कि एखादा विद्यार्थी अभ्यास करण्याची क्षमता असून देखील मनाच्या त्या पोकळ व अडथळा भिंतीमुळे तो विद्यार्थी कायम नकारात्मक विचार येणे साहाजिक आहे .

0 

Share


l
Written by
lavi k

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad