Bluepad | Bluepad
Bluepad
शुभ ....
विश्वास बीडकर
15th May, 2022

Share

आपला भारत का असतो आपला
सिग्नलला उभ्या असलेल्या गाड्या वाटतात आपल्या .
रेस्टॉरंट्स मधल्या डिशेस
रूचकर आपल्या .
रस्त्यावरची माणसं भिन्न भाषेची असतात आपली .
वाहणारा वारा गरम का असेना
वाटतो आपला .
गर्दीला आलेला घाम ही असतो
एकटा आपला .
वीट आणणारा राजकारण ,
तरीही वाटतं आपलं .
जिंकल्यावर क्रिकेटपटू असतातच
आपले .
हरले तरी भासतात ते
जीवाभावाचे आपले .
समोरचा पोलिस घाबरवतो ,
तरी वाटतो आपला .
सिनेमा , सिरियल असली रटाळ तरी असते आपली .
रोजची कंटाळवाणी चाकोरी ,
तरी असते ती आपली .
हेच भासत नाही या अमेरिकेत
असेल जरी सुबत्ता .
आठवतो भारतातलाच आपल्या
घराचा पत्ता !
शुभ रविवार .
१५ मे २०२२ .

169 

Share


Written by
विश्वास बीडकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad