परमेश्वराची अभयवाणी
हे प्रीय! माझ्यात संभव असंभव अशी कोणतीही कल्पना करु नकोस.मी काहीही करू शकतो.चंद्र सूर्य माझ्या माझ्या अाज्ञेबाहेर नााहीत.मी कमळाच्या देठांनी हत्तींना बांधू शकतो,गोष्पदामधे पृथ्वी बुडवू शकतो.माझ्या गतीचा निर्णय करू शकेल अशी शक्ती कोणातही नाही.
तू देह चिंता,अर्थ चिंता सर्वाचा त्याग कर.मी त्याची व्यवस्था केली अाहे हे लक्षात ठेव..फक्त अंतकरणा पासून नाम घे.
तू फक्त नाम घे...नाम घे...जो पर्यंत स्थीर हौत नाही तो पर्यंत फक्त नाम घे.तुझ्या पायाखालची पृथ्वी सरकू लागली,डोक्यावरच अाभाळ कोसळू लागले,तरी कुठेही लक्ष देऊ नकोस..दिवसरात्र फक्त नाम घे...तू निश्चीत जाण तू माझ्या कुशीत सुरक्षीत अाहेस..मी तुला छातीशी कवटाळून तुझे रक्षण करतो अाहे.
नाम घे...नाम घे.
भक्तीने घे..अभक्तीने घे,सुखात घे..दुःखात घे,ऊपेक्षेने घे...श्रद्धेने घे,कौलाहलात घे..एकान्तात घे,जागृतीत घे...स्वप्नात घे.,तुझा सर्व भार मी घेतला अाहे..ही माझी प्रतीज्ञा अाहे..
काहीही विचार करू नकोस,नाममय होऊन जा,कलीयुगात मी "नामरूपात" अालो अाहे
नाम घे....नाम घे...नाम घे...