*आंतरराष्ट्रीय कुटूंब दिन*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
माणसाच्या जीवनात कुटूंब म्हणजे एक प्रकारचा स्वर्गच म्हणावा लागेल कारण या जगात प्रत्येकजण काहीनकाही स्वार्थासाठी किंवा आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी अगदी सकाळपासुन संध्याकाळपर्यंत प्रयत्न करत शेवटी घर जवळ करतो कारण या धावपळीच्या युगात *धावण्याचे व धडपड करण्याचे सामर्थ आणि शक्ती देणारे हे आपले कुटूंबच असते*.
एकत्रीत कुटूंबात राहणे म्हणजे एकतेचे महत्व दिसुन येते. एकमेकाला एकमेकाशी सहवास मिळतो एकप्रकारचा आनंद व माणसिक समाधान मिळते. त्यामध्ये जर आजी-आजोबा, आईवडिल असतील तर खरंच कुटूंबाला घरपणाची जाणीव होते व कुटूंब पुर्ण असल्यासारखे वाटते. कारण *कुटूंबाला खरी गरज असते ती वडीलधा-या व्यक्तींच्या अनुभवाची आणि आशिर्वादाची*. म्हणुन कुटूंबाची खरी शोभा ही आईवडीलांमुळेच येते. कुटूंबाशी इतर लोक हे स्वार्थासाठी जोडलेले असतात परंतु फक्त कुटूंबच हे निस्वार्थपणे एकमेकाशी जोडलेलं असते. कुटूंबावर कितीही मोठे संकट आले तरी सर्वामुळे त्यामध्ये मार्ग काढणे अगदी सहज सोपे होवुन जाते. पैसैतर सर्वच कमावतात परंतु खरा नशीबवान तोच जो कुटूंब कमावतो.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *आंतरराष्ट्रीय कुटूंब दिनाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा* !