सायंकाळची वेळ होती सर्व काम आटपुन मी सहज बाहेर बसलेले. आणि अचानक पाऊस बरसु लागलं. कपडे,साबण.... वगैरे घरात ठेऊन मी पाऊसाचं आनंद घ्यायला बाहेर आले. मातीचा एकदम भन्नाट वास येत होता. अगदी मन मोहरुन जात होते. आणि केसांतुन ओघळणारे ते पाणी..!
पप्पानच्या आवाजाने जाग आली. पप्पा ओरडत होते पाऊसातकाय भिजतेस. तुला दुखणं येतं लगेच माहित आहे ना घरात ये नि चहा बनव. सगळा मुड ओफ केला. थोडं निराश वाटले चहा बनवुन दिलं नि पुन्हा बाहेर आले. मी अन् पप्पाचं ऐकलं असतं वाटतेय पुन्हा बाहेर आले.खवळतील म्हणुन दारातचं खुर्चीवर पावसाला पाहत बसले.
आणि तिथेचं शेजारी दाराच्या कडेला छत्री होती. मी निरखुन पाहिले तर..ती मला काही सांगु इच्छित होती पण..माझेच लक्ष नव्हते..मीचं जरा घाबरले चेहर्यावरून स्पष्ट दिसत होते. नाजुक आवाजात छत्रीच जणु माझ्याशी संवाद साधु लागली. अगं घाबरु नकोस म्हणुन तिनेच दिलासा दिला.
मी थोड्यावेळ शांत बसले आणि ठिक ठाक झाले. अन् तिनेचं माझ्याशी संवाद साधयला सुरुवात केली. पहिले अवघडल्यासारखे वाटत होतं. नंतर मस्त मैत्री झाली. चांगल्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आणि मी एक प्रश्न केला. छत्रीताई तुला आवडते का गं असं जगणे? तिच्या उत्तराने मन प्रसन्न झाले.
अगं मला आवडण्याचं मुळीचं विषय नाही. मला तर..तुमचे पावसापासून/ उन्हापासून रक्षण करण्यातचं भरपुर समाधान आहे. मलाहि वाटते दररोज मला बाहेर काढावे. माझंही थोडाफार लाड करावा. पावसाळ्यात अडगळीच्या खोलीतुन बाहेर काढतात आता पाहं ना तु मला गेले कित्येक दिवस झाले पाहिलेस का तरी..आज पाऊस आला म्हणुन मला बाहेर काढलतं,पुसले...नाहितर किती दिवस धुळ खात पडले होती ना ? पण..तरी समाधान आहे कि अजुनही तुमच्या मनात मी जिवंत आहे.
मी बर्याचं लोकांशी बोलण्याच प्रयत्न केला पण.. माझ्या बोलण्यात कोणाला रस आहे नाही ऐकुन घेण्यासाठी टाईम. अगं बोल गं ताई मी आहे ना,,,,
कंटाळा नाही का गं येत तुला...हो येतो ना खुप कंटाळा येतो. पण..आता ते तर..जगावेच लागणार. मग आपणचं ठरवायला हवे ना? " रडतं रडतं जगायचे कि गाणे म्हणतं..." म्हणुन माझ्या मते मनुष्यानेही बोध घ्यावा एकचं आयुष्य आहे..कोण किती दिवस राहणार कोणालाच काही माहीत नाही तर..द्वेष हा शब्दचं नको आणि हो दुसर्यांशी तुलनाही नकोच..!
बघं न माझे बहिन-भाऊ माझ्यापासून सगळे दुरावले मी तुमच्या घरी आले नि सगळचं विसरले. होगं ताई जिवण आपलं आपल्यालाच पुर्ण करायचे कोण सोबत असो अथवा नसो हो न..?
हो गं अगदिचं खरं ! पावसाचे थेंब तर उन्हाच्या छळाया नको वाटतात कधी त्या वेदना नको वाटतात. पण.. खुप दिवसांनी बाहेर पडणार हे दृश्य अनुभवतानी सगळं दु:ख विसरायला होते. खुप दिवसांनी एवढ्या मनमोकळ्या गप्पा मारले. असचं बोलत जा नेहमी..आणि मला कोणीतरी हलवत म्हणुन भास झाला. म्हणुन डोळे उघडले तर..आई हाकेवर हाक देऊन माझ्या नावाने ओरडत होती. मी जागी झाले स्वप्न होतं पण...ते जे काही स्वप्नात सांगितले ते खरचं होत. एवढं मात्र पटण्यासारखेचं हे नाकारता येत नाही.