Bluepad | Bluepad
Bluepad
नारीशक्ती चा गौरव
मयुरी_व.सु._जोशी
मयुरी_व.सु._जोशी
15th May, 2022

Share

नुकताच मदर्स डे होऊन गेला.. महिलांसाठी महिला दिन आणि मदर्स डे अगदीच महत्त्वाचे दिवस..
महिला दिन म्हटलं की एक आठवण ताजी झाली.. मी मानसी.. एका सामान्य कुटुंबातील मुलगी.. दहावी झाल्यावर डिप्लोमा केला आणि नंतर इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतले.. इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे अभ्यासासोबत सांस्कृतीक जोड..
कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होत असत.. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना आम्ही सर्व मुलींनी मिळून महिला दिन साजरा करण्याचे ठरविले.. त्यानुसार सर्व तयारी केली आणि मान्यवर कोणास बोलवायचे यांवर चर्चा झाल्यावर ठरवलं की शहरातील एका नामांकित कंपनीच्या मालकीण असलेल्या माननीय खांडेकर मॅडम यांना बोलाविण्याचे ठरविले. आणि ह्यावेळी या सर्व मान्यवरांसोबत अजूनही एक प्रमुख पाहुण्यांस म्हणजेच सौ.देशपांडे मॅडम यांना बोलवण्याचे ठरवले सोबतच कॉलेजचे प्राचार्य, सर्व शिक्षक वृंद...
नियोजनाप्रमाणे ८ मार्चला सकाळी ११ वाजता कार्यक्रम सुरू झाला.. व्यासपीठावर माननीय खांडेकर मॅडम, सौ.देशपांडे,कॉलेजचे प्राचार्य आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.. कार्यक्रमाची प्रस्तावना, सरस्वती पूजन झाल्यावर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याचा कार्यक्रम सुरू झाला.. सर्व मुलींचे नेतृत्व म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करीत होते..सुरुवातीस माननीय खांडेकर मॅडम यांचे स्वागत कॉलेजचे प्राचार्य यांनी केले.. त्यानंतर सौ.देशपांडे मॅडम यांचे स्वागत करायचे होते पण त्यापूर्वी मी त्यांचा गौरव करण्यापूर्वी त्यामागचा हेतू आपल्यापुढे सांगु इच्छिते..
नारीशक्ती चा गौरव
सौ.देशपांडे मॅडम एका सर्वसामान्य कुटुंबातल्या गृहिणी..नौकरी करून घर सांभाळणार्या महिलांच कौतुकच आहे पण नौकरी न करणार्या महिलांची खिल्ली उडवण्याचा,त्यांना कमी लेखण्याचा अधिकार कोणालाच नाही.. नौकरी करायची की नाही,व्यवसाय करायचा की नाही हा सर्वस्वी त्या महिलेचा वैयक्तिक निर्णय आहे.आणि तिच्या त्या निर्णयाचा आपण आदर केलाच पाहिजे.नौकरी न करता घर आणि मुलं सांभाळण्यास प्राधान्य देण्यात कसला आला कमीपणा..
आपण घर सांभाळणार्या जबाबदारीस नेहमी दुय्यम दर्जाचं स्थान देत आलोय. पुरुषांच काम करणं आणि पैसा कमावणे ही आणि हीच महत्वाची जबाबदारी आहे असे आपला समाज मानत आला आहे आणि म्हणूनच महिलांनी आजपर्यंत समर्थपणे पेललेल्या जबाबदारीच महत्त्व आपण समजू शकलो नाही.
महिलांच सक्षमीकरण तेव्हाच होईल जेव्हा त्या जेही करतील त्याला महत्त्वाचं मानल्या जाईल,मग ते घर सांभाळणे असो किंवा नौकरी करणे किंवा व्यवसाय.. स्त्री जे घरात करते ते पण पुरुषांनी घराबाहेर केलेल्या कामा इतकंच महत्त्वाचं असतं.अस जेव्हा आपला समाज मानायला लागेल त्यादिवशी महिला खर्या अर्थाने सक्षम होतील.. आणि तो दिन खरा महिला दिन म्हणुन साजरा करता येईल..
सौ.देशपांडे मॅडम ह्यांचा गौरव प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आला.कॉलेजच्या प्राचार्यांचा सत्कार शिक्षकांच्या हस्ते झाला.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मनोगत झाले आणि कार्यक्रमाची सांगता झाली..

245 

Share


मयुरी_व.सु._जोशी
Written by
मयुरी_व.सु._जोशी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad