तु चव विसरला
तुझ्या अस्तित्वाचं भान विसरला,
तिच्या पाठीमागे, तु
सर्व जगाला विसरला.
आठवणीत रमला, तु
आयुष्यात दंगला
हरवून नाते, तु
स्वाभिमान विसरला.
आयुष्याला हरला, पण
जिंदगीला बचावला
इतरांच्या बोलात स्वतःचं
भान विसरला.
नाही केला जगाचा विचार
सुखी फक्त आपलाच संसार
याच विचाराने तुला,
प्रेमातून घ्यावी लागली माघार...
कवी - यश अडाळे { C. S. }
Jalgoan jamod
7666726454