कंटाळा आला आता
आयुष्य जगण्याचा
जगण्याची एक उमेद
मिळली होती प्रेमाचा
आयुष्य जगण्याच
माझं राहून गेल
जीवनातल एक
पान कोरच राहील
मी नेहमी झिजत
राहिले दुसऱ्यांसाठी
स्वत:चा विचार नाही केला
जगायचं होतं फक्त माझ्यासाठी
आयुष्याच्या वाटेवर
ठसे उमटले दु:खांचे
कर्तव्य निष्ठेच्या पुर्तीसाठी
त्याग केले सुखाचे
शेवटी मृत्यू आला
माझ्या जवळच
पण जगयाच राहून
गेले माझ्या नकळतच
...✍️ कवयित्री अनुश्री