Bluepad | Bluepad
Bluepad
आसवांनो द्या खुलासे
Arnaw Shrirame
Arnaw Shrirame
15th May, 2022

Share

आसवांनो द्या खुलासे कुठे उगा वाहतात का?
दुःख कर्पूरी वेदनांचे तुम्ही उगा साहतात का?
जन्म गेला पाखराचा टिपण्यास दाणे रानातूनी
पुस्तकांची पाने सारखी उगाच ते चाळतात का?
उसवले घरटे जुने कुणाच्या सोबतीने बांधलेले
जळत्या वणव्यात पेटतांना ते उगा पहातात का?
हा कसा हिशोब केला नियतीने प्राक्तनाशी असा
दाटता उरी वेदना अन दुःखात त्या दाहतात का?
त्रस्त मी दुःखात माझ्या अन मस्त ती सुखातुनी
अंती सुखाला दुःख माझे पुन्हा पुन्हा भावतात का?
डॉ. राजू श्रीरामे
भ्रमणध्वनी : 7620881729

181 

Share


Arnaw Shrirame
Written by
Arnaw Shrirame

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad