Bluepad | Bluepad
Bluepad
२) मी ऐकलेलं छत्रीचं मनोगत!
r
rutik Graphics Chinchpur Ijde
15th May, 2022

Share

मी एक छत्री बोलत आहे. मा
२) मी ऐकलेलं छत्रीचं मनोगत!
२) मी ऐकलेलं छत्रीचं मनोगत!
झा उपयोग पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात केला जातो.पावसाळ्यात पडणाऱ्या पावसापासून मी तुमचे रक्षण करते.याशिवाय उन्हाळ्यातही माझा उपयोग केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र उन्हापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी मला वापरले जाते.पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी मी काढून बाजूला टाकते. शिवाय उन्हाळ्यात पडणाऱ्या सूर्याचे ऊन शरीरावर पडल्यापासून मी तुमच्या संरक्षण करते,परंतु जास्त करून माझा उपयोग पावसाळ्यातच केला जातो. पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही मला आजूबाजूला पाहू शकता. पावसाळ्याच्या दिवसात मी खूप उपयोगी वस्तू बनवून जाते या दिवसात माझी खूप काळजी घेतली जाते.मी रंगीबिरंगी आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये येते. परंतु जास्तकरून लोक मला काळ्या रंगांमध्ये खरेदी करतात. रंग कोणताही असो आमचे कार्य सारखेच असते. पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरच माझी वेगवेगळी रूपे बाजारात उपलब्ध असतात. लांब दांड्यावली आणि घडी घालता येणारी छत्री मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. परंतु लोकांना घडी घालता येणारी छत्री जास्त आवडते. कारण माझ्या या रूपाला फोल्ड करून बॅग व पिशवी मध्ये ठेवता येते.पावसाळ्यात तर माझी मौज असते. परंतु दुसरीकडे पावसाळ्याचे चार महिने संपले की मी घराच्या कोपऱ्यात पडून राहते. वाट पाहत राहते की केव्हा पाऊस येईल व केव्हा कोणीतरी मला उघडून थंड पावसाचा स्पर्श करविल. मला लोकांची मदत करायला आवडते. स्त्री असो वा पुरुष मी प्रत्येकाला पावसात भिजण्यापासून वाचवते.

172 

Share


r
Written by
rutik Graphics Chinchpur Ijde

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad