Bluepad | Bluepad
Bluepad
आई एक कोणालाही न समजणारे कोडे
Darshan Joshi
Darshan Joshi
15th May, 2022

Share

आई ही किती झालं तरी माणूस असते. आणि माणूस म्हंटलं की राग, लोभ, द्वेष, इर्ष्या, कंटाळा, मत्सर, तिरस्कार, मोह या सगळ्या भावना आल्याच. पण आईपणाच्या चौकटीत अडकलेल्या बायकांना या इतर भावना सहज व्यक्त करण्याचीही चोरी होऊन बसते. सतत मुलांच्या मागेपुढे नाचायचा कंटाळा येतो असं म्हणायची सोय उरत नाही. मुलं लहान असतांना कितीही लाडाची असली तरी कोणीतरी त्यांच्याकडे जरा वेळ बघावं आणि आपल्याला स्वतःसाठी जरा तरी वेळ मिळावा असं तिलाही वाटतं. पण असं नुसतं बोलून दाखवलं तरी तिच्यावर ‘वाईट आई’ असल्याचा शिक्का बसतो. टीनएजर मुलं कोणाचंच ऐकत नाहीत, त्यात आईचंही ऐकत नाहीत. मुलांचं लग्न होतांना तर आईची अजूनच चमत्कारिक परिस्थिती होते. तिला मुलगा असो नाही तर मुलगी, त्यांच्या संसारात मध्ये बोललं तरी पंचाईत होते आणि काही वेळा दिसत असतं की हे नवीन नवरा बायको किरकोळ कारणांवरून भांडतायत. यांना समजावून सांगितलं तर त्यांचा संसार मार्गी लागेल. अश्या वेळी मध्ये बोललं नाही तरी गडबड होते.थोडक्यात काय, तर अगदी तान्ह्या नुक्त्या जन्माला आलेल्या बाळापासून ते स्वतः आई / बाप होऊ घातलेल्या मुलांपर्यंत मुलांचं वय काहीही असलं, तरी आईवर आईपणाचा ताण असतोच. त्याचं स्वरूप फक्त बदलत राहतं. अशा वेळी निदान घरातल्या आणि जवळच्या लोकांनी तिला समजून घेतलं तरी तिला खूप दिलासा मिळतो. तीही माणूस आहे. तीही चुकू शकते. तिलाही कंटाळा येऊ शकतो. तिच्या स्वतःच्या आयुष्यात आणि शरीरातही या प्रत्येक टप्प्यावर बदल होत असतात. त्यांचा परिणाम अपरिहार्यपणे तिच्यावर होत असतो. इतकी साधी गोष्ट जरी घरातल्या माणसांनी समजून घेतली तरी तिच्यासाठी तिचं आईपण अधिक आनंददायक होतं. कारण आई आनंदी असते सदैव सुखाचा विचार करणारे सुख कश्यात आहे हे मुलीचे सुख समाधान सुद्धा शोधत सुख म्हणजे आई कारण आई खूप अंग आहे जे आई पानात धन्यता वाटणारे कोडे आई कोणाला ना बाळ होते तेव्हा सासू सासरे आनंदी निशकपट वागते कारण नियम अनुसार वागणे किती छान वेगळे आहे कारण आई असते मनात काही नसते आपण कितपत योग्य वागणूक. देतो त्यावरून आई वडिलांना आपण कधी समजून घेताना कमी त्याच्या इच्छेप्रमाणे काही गोष्टी केल्या तर काही बिघाडनार काही कारण आयुष्य एका एक मत महत्त्वाचे असते दादा ला दिलेली वचन इतके महत्वपुर्ण आहे म्हणायला नको कारण आपण किती महत्त्व दिले हे महत्व आहे वचन दिले तरी पूर्ण होऊ द्यावे त्याने आनंद मिळू शकलो मदत करू शकलो किती छान होईल कारण आपण पैसे पेक्षा नाती महत्व असते कारण खूप छान वागले तर नाही तर प्रतिघात निश्चित आहे हे खरे आहे .

240 

Share


Darshan Joshi
Written by
Darshan Joshi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad