वाहे ओसांडुनी
भक्ति भाव
नोहे कोणतेच माप
मोजावया
जाणीव ती आत्म्याची
असे परमात्म्याला
नसे कुठली हाव
असा भक्ती भाव
भावानची घालमेल
जीवाचा नाही मेळ
अशी श्रध्दा कोठे
माझे स्वामीचे मन खुप मोठे
नको अहंभाव मनी
असावे सतत
स्वामी अंतकरणी
लोंटागण माझे स्वामीच्या चरणी
जय जय स्वामी समर्थ