Bluepad | Bluepad
Bluepad
माफी असावी
Nilambri Kolhare ( Ashtekar)
Nilambri Kolhare ( Ashtekar)
14th May, 2022

Share

माफि असावी
स्वामीराया
विसर अहो पडला
रोजच्याच या धावपळित
भक्ति भाव होरपळला
रोजचच पळण
नशिबी
रोजचच मरण
सांगु काय स्वामि माय तुजला
रोजचच रे आमच विरघळण
आई आहे पाठिशी
म्हणुन
जरा बेफिक्रिने वागण चाललय
पावलो पावलि साथ तुझि
म्हणुन
बिनधास्त जगण चाललय...
संवाद माझा नाहि तुझ्याशी
बघण पण होत नाहि
हे स्वामि राया खर सांग
म्हणुन
माझ्या मनी नाहिस तु
अस रे होत नाहि
ठावुक आहे तुला दगदग माझी
ठावुक आहे तुला
तकतक माझी
प्रत्येक श्वासागणिक असते रे नामस्मरानी माळ माझी
नाहि‌ होत रे वेळ
बघण्यास क्षणभर तुला
पण एक सांगु
डोळे लवतात ज्याक्षणी तस्वीर तुमची दिसते हो मला
मग मन होते बिनधास्त
शांत निज येते
पुन्हा नव्याने दिवस उजाडतो
सकाळ दिसते
शास्वति भेटते
स्वामी माझे पाठिशी आहेत
पुन्हा तिच अदृष्य भक्ती घेवुन‌ जीवन रहाटी चालु लागते ...
जय सदगुरु
माफी असावी
श्री शंकरबाबा महाराजाय् नम:

225 

Share


Nilambri Kolhare ( Ashtekar)
Written by
Nilambri Kolhare ( Ashtekar)

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad