Bluepad | Bluepad
Bluepad
अडिच की
Nilambri Kolhare ( Ashtekar)
Nilambri Kolhare ( Ashtekar)
14th May, 2022

Share

जीवनाच्या या अडिच अक्षरात
अडकुन पडला मनुष्य...
नवग्रहांची पंगत सजते
सप्त पदिंची फेरी सजते...
गुरफटते अवघे जीवन...
जुनेच पुन्हा गिरवण्यास...
अनुभवांच्या लाटेवरति...
समजदारिचे पाट वाहतात...!
कर्तव्याचे ओझे वाहत
जिवनाचा गाडा ओढतात...!
राहुन जातो‌ मग
*तो* अडिच अक्षरांचा विचार
दुसर्या करता... करता करता...
करतो आपण *त्या* अडिच अक्षरांला नकार
मग राहुन जाते सगळे काहि
शेवटच्या वळणावरति
राहतात फक्त भास
चढता चढता त्या *सरणा* वरति
ते अडिच अक्षर म्हणजे
*स्वता* ...

176 

Share


Nilambri Kolhare ( Ashtekar)
Written by
Nilambri Kolhare ( Ashtekar)

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad