प्रारब्धाचे भोग कोणाला चुकले..?
कर्माची परतफेड..., परतफेडिचे कर्म....
विधात्याने जन्माच्या वेळिच तर लिहिले.....!
बळिने प्रारब्दाची परत फेड दानानी केली
इतकी कि त्याची परतफेड परमात्माला बंधुन गेली
कोणी ठरवुन करत नाहि कर्म
इश्वराचे ठरवलेले जे मर्म त्याच वाटेवर पावुल चालतात
विरोध कितिहि मनाने मनाचा केला तरि
कर्माचा लिखित अभिनय कलाकाराला करावेच तर लागतात
भुमिका आवडिचि नावडिचि प्रश्नच उरत नाहि
जेव्हा चरित्राला अनुसरुन लिखित अभिनय करावाच लागतो
तिथे मी च का ..?
हा प्रश्नच मुळी योग्य ठरत नाहि
भगवंतानी ठरवलेलि वाट
वाटेवर चालणारी वाटसरु
बस इतकच लक्षात घेणे
बाकि
महाराजांच्याच हाती
आपल्याला कुठे नेणे
.....!
जय शंकर महाराज