Bluepad | Bluepad
Bluepad
मातृदिनाची भेट - माझीही एक अलक
दीपा बिरादार
दीपा बिरादार
14th May, 2022

Share

एकुलता एक लेक परदेशात गेला नोकरीसाठी .एकटाच रहातो
बऱ्याच जणांची मुलं जातात तसा .
काटेकोरपणे तिथल्या वेळा शिस्त सांभाळत बाकी house hold chores करतो
बऱ्याच जणांची मुलं करतात तशी
एकतर लेकरु लांब ,शिवाय जरी house keeping ,cleaning ,laundry अशी गोंडस नावं दिली तरी करायचेय धुणी भांडी केर फरशी आणि स्वयंपाक हेच न त्याशिवाय office ला जाणं येण
माझा आईचा जीव कळवळला ,
बाळा ,खुप काम करावी लागतात रे तुला !
नाही आई ,तु करतेस त्या पेक्षा कमीच ग .
डोळे न मन दोन्हीही भरुन आलं
आईच्य कामाची जाणीव असणं या शिवाय मातृदिनाची मोठी भेट असु शकेल ??

228 

Share


दीपा बिरादार
Written by
दीपा बिरादार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad