Bluepad | Bluepad
Bluepad
इतरांसाठी आदर्श होण्याचा प्रयत्न करा.
  Mr. Rutwik
Mr. Rutwik
14th May, 2022

Share

Don't be motivated from others;
try to "be The Motivation for others "
आयुष्यमद्धे प्रत्येक व्यक्तीचे एक आदर्श मार्गदर्शक असतातमग् ते आपले आई -वडील असोत किंवा इतर व्यक्ती. पण आपल्या जीवनमद्धे असा कोणीतरी असतंच की ज्यांच्या विचाराने आपण प्रेरित होतो अथवा त्यांचे विचार आपण आपल्या जगण्यामद्धे उपयुक्त करत असतो ,परंतु आपण कधी असा विचार करतो का की आपण पण इतरांसाठी प्रेरणास्रोत व्हावा ,इतरांसाठी मार्गदर्शक ठराव?आपणपण इतरांसाठी मार्गदर्शक होऊच शकतो की ...
आपल्या समाजामद्धे असे अनेक थोर मार्गदर्शक होऊन गेले आहेत ज्यांचे विचार आपण आजही आचरत असतो ,मग ते सिंधुताई सपकाळ पासून ते ए.पी.जे. अब्दुल कलामंपर्यंत त्यांचे प्रत्येक विचार हे प्रेरणादायक आहेत.. इतरांसाठी मार्गदर्शक होन्यासाठी वयाची अट नसते असे कितीतरी व्यक्तिमत्व आहेत जे की वयाने लहान आहेत परंतु विचारांनी कितीतरी मोठे आहेत याचा ताजा उदाहरणं म्हणजे " द एम.बी.ए. चाय वाला " हे नाव बहुदा सर्वांच्याच परिचयाच असाव , हा M.B.A. Chai Wala ही शाखा एका 22 वर्षीय मुलाची आहे ,आज तो कितीतरी युवकांसाठी प्रेरणास्थान बनला आहे तो युवकांचे मार्गदर्शक ठरला आहे तो म्हणजे त्याच्या विचारांनी . इतरांसाठी प्रेरणास्थान होण्यासाठी कोणत्याहीप्रकाच्या आर्थिक बाबींची गरज नसून गरज असते ती फक्त आपल्या विचारांची ,आणी अनुभवांची.
फक्त थोर व्यक्ती, बिरला, अंबानी यांसारखेच लोकच् प्रेरणास्थान होऊ शकतात असा काही नाही आपण ही इतरांसाठी प्रेरणास्थान बनू शकतो त्यासाठी गरज असते ती फक्त आपल्या विचारांची . आपण कोणत्याही क्षेत्रामद्धे असलो तरी आपले विचार ,आपले अनुभव हेच आपल्याला मोठे बनवतात. आपल्या सर्वांच्या आयुष्यमद्धे असे काही प्रसंग येत असतात की ज्यातून आपण खूप काहि शिकतो आणी हेच आपले अनुभव ,आपले विचार हे आपण इतरांपर्यंत पोहचवू शकतो आणी त्या विचारामधून आदर्श घ्यायचा का नाही हा ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न आहे. शंभर पैकी दहा लोकांनी जरी आपले विचार आत्मासात केले तर समजून जावा की आपण यशाची पहिली पायरी चढली. आणी असंच आपण एक एक टप्पा पुढे चालायचा.
आजकाल सोशल मीडिया हा एक उत्पन्नाचे मार्ग म्हणून ओळखला जाऊ शकतो . youtube ,instagram ,facebook असे अनेक स्रोत आहेत ज्यावर आपले विचार पाठवून त्याचे व्हिडिओ बनवून आपण या चॅनेल वर प्रसिद्धी मिळवू शकतो. आणी आपनहि इतरांसाठी प्रेरणास्रोत म्हणून ओळख मिळवू शकतो.
Don't follow others in life
Let ,the other people follow you.
धन्यवाद !!

194 

Share


  Mr. Rutwik
Written by
Mr. Rutwik

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad