Bluepad | Bluepad
Bluepad
नोकरी मिळविण्यासाठी करा 'हे' धार्मिक उपाय
O
Omkar Bhosale
14th May, 2022

Share

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे) प्रत्येक जणाला यशस्वी व्हावे असे वाटते. खूप मेहनत आणि प्रयत्न करूनही काही जणांना नोकरी मिळत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत ग्रहांच्या कमकुवत आणि वाईट स्थानामुळे बऱ्याच वेळा आपल्याला नोकरी लागताना समस्या निर्माण होतात. तुमचे भाग्य बळकट करण्यासाठी आणि नोकरी मिळत नसल्यास ज्योतिष शास्त्रानुसार काही उपाय सांगितले आहेत.

१) पिंपळाची पूजा:
तुम्हाला नोकरी लागत नसल्यास प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी द्या आणि झाडाच्या खाली दिवा लावा. त्यामुळे आपले पितर तृप्त होतात. पिंपळाच्या झाडावर तीन वेळा लाल धागा बांधा आणि मनात तुमच्या पाहिजे असलेली नोकरीची इच्छा करा.

२) शनि देवाची पूजा:
शनिवार हा शनिदेवाला समर्पित वार आहे. दररोज शनिदेवाची पूजा करा. शनिदेव प्रसन्न झाल्यास विघ्न दूर करतात असे मानले जाते. शास्त्रानुसार ज्यांचा शनी बलवान असतो अशा लोकांना लगेच नोकरी लागते. ओम शनीश्वराय नम: हा शनिदेवाचा मंत्र म्हणावा.

३) कावळ्यांना तांदूळ खाऊ घालणे:
कावळ्यांना उकडलेले तांदूळ खाऊ घालने खूप फायदेशीर असते. हा उपाय शनीच्या अशुभ प्रभावांना शांत करण्यास मदत करतो. त्यामुळे लवकरात लवकर नोकरी मिळवण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता.

४) सूर्य देवाची पूजा करावी:
सूर्य हा अंधाराला नष्ट करून प्रकाश आणतो. असं म्हणतात की सूर्याची पूजा केल्यास कधीही दारिद्र्य येत नाही. सलग सत्तावीस दिवस सकाळी स्नान झाल्यावर उगवत्या सूर्याला पाणी आणि फुले अर्पण केल्यास आपली आवडती नोकरी मिळते परंतु एकही दिवस न चुकता हा उपाय करावा. तसेच दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यात गूळ टाकून सूर्याला जल अर्पण केल्याने सुद्धा फायदा होतो. धार्मिक मान्यतेनुसार सूर्याला पाणी अर्पण केल्यास सूर्यदेव प्रसन्न होतात.

५) शमीची पाने:
ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्याला सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करूनही यश मिळत नसेल जेव्हा कधी नोकरीच्या मुलाखतीला जाताना सोबत शमीची पाने घेऊन जावे. ही पाने अशा ठिकाणी ठेवा की त्याचा स्पर्श शरीराला होत राहील. असे मानले जाते की, शमीची पाने सोबत असतील तर यशाच्या मार्गात अडथळा आणणारे दोष नष्ट होतात तसेच यशाचे मार्ग खुले होतात.

नोकरी मिळविण्यासाठी करा 'हे' धार्मिक उपाय

६) हनुमानाची पूजा करावी:
हनुमान हा संकटमोचक आहे. तुमच्या घरात हवेमध्ये उडणाऱ्या हनुमानाची एक प्रतिमा नक्की लावावी. ज्या घरात अशी प्रतिमा असते ते घर सुख समृध्दीने पुढे जाते. हनुमान भक्ताच्या सर्व अडचणी तो दूर करतो त्यामुळे दररोज हनुमान चालीसा म्हणावी
.
७) शिवलिंगावर जल अर्पण करावे:
शिवलिंगावर जल किंवा दूध चढवावे तसेच एखादा गोड पदार्थ ठेवावा. शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्याने अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते असे म्हणतात. महादेवांना धतुराचे फुल वाहील्यास आपल्या समोरील अडथळे दूर होतात.

८) हनुमानाला शेंदूर लावावा:
काही लोकांना नोकरीमध्ये वरचे पद हवे असते अशा लोकांनी प्रत्येक शनिवारी हनुमानाला शेंदूर लावावा आणि मोहरीच्या तेलाचा एक दिवा नक्की लावावा.

९) पक्ष्यांना धान्य टाकावे:
सात प्रकारचे धान्य एकत्रित करून पक्षाला टाकावे. असे केल्याने भाग्य बळकट होते.
विश्वासामध्ये शक्ती असते असे म्हणतात. सुखी आणि स्थिर जीवन जगण्यासाठी यशस्वी आणि स्थिर नोकरीची गरज असते. ज्यांना नोकरी मिळण्यास अडचण येत आहे असे लोक वरील उपाय करू शकतात तसेच ज्योतिषाचीही मदत घेऊ शकतात.
तसेच केवळ नोकरी मिळण्याच्या आशेने न करता एक चांगली सवय म्हणून जरी दररोज सकाळी उठून सुर्याला नमस्कार केला, पशू-पक्ष्यांना अन्न खाऊ घातले तरी आपल्याला बरेच पुण्य मिळेल आणि त्याचा फायदा कुठे ना कुठेतरी होईलच.

548 

Share


O
Written by
Omkar Bhosale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad