Bluepad | Bluepad
Bluepad
अपक्ष नागरिक
विनय नारायण
विनय नारायण
14th May, 2022

Share

हल्ली सोशल मिडीयावर वेगवेगळ्या राजकीय लोकांचे इंटरव्ह्यू दिसतात, पोस्ट फॉरवर्ड केलेल्या असतात, चिथावणारे व्हिडिओ असतात. त्यात काय तथ्य असतं नसतं हा भाग आपण बाजूला ठेवू.
मुद्दा असा आहे की हे सगळं वाचून ऐकून अशिक्षित नागरिक रस्त्यावर उतरतो तर सुशिक्षित नागरिक विविध मार्गाने तावातावाने त्यावर शाब्दिक चकमक करतो. दोघेही आपली अक्कल गहाण ठेवतात.
कशासाठी चाललंय हे सगळं? याचा कधीच विचार होताना दिसत नाही. बालभारती मधली प्रतिज्ञा आपण नकळत विसरून जातो.. राष्ट्रगीताचा अर्थ काय हेही आपल्या लक्षात रहात नाही.
ह्या राजकारणी लोकांना काय हवं असतं ते आपण पाहिलं पाहिजे. लोकांची मन कलुषित करायची, त्यांना भडकवायचं आणि वातावरण तापलं की पुढच्या निवडणुकीत आपली पोळी भाजून घ्यायची. मग..नागरिकांच्या घरी चूल पेटली नाही तरी चालेल किंवा त्यांची घरं पेटली तरी चालतील.
अपक्ष नागरिक राजकारण्यांना वापरायला शिकतील तो सुदिन.
विनय नारायण
१४ मे २०२२

189 

Share


विनय नारायण
Written by
विनय नारायण

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad