करोनाच्या काळात गोंदवलेला जाता आले नाही परवा अचानक जाण्याचा योग आला तेव्हा गोंदवलेला जाताना सुचलेले शब्द गुंफले काव्यात
🙏🙏 श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏
अनुग्रह घेतला आणि गुरुगृह झाले माझे माहेर ll
गुरूंनी दिला मला श्रीराम नामाचा आहेर ll
लाभले समाधान हलका झाला दुःखाचा भार ll
आयुष्य लागले नामस्मरणी कळले जीवनाचे सार ll
🙏 जय श्रीराम 🙏