कविता...
लोकशाहीची शवयात्रा
एकदा एक गंमत झाली
जंगलात निवडणूक झाली
हातात घालून घड्याळ
वाघोबाची स्वारी आली...१
कुणालाही बहुमत नव्हतं
म्हणून मग मतामती झाली
लोणी वाटून घेतलं बोक्यांनी
जिभळ्या चाटण्याची वेळ आली..२
तू भगवा मी भगवा यात
दोन बोकं भांडून मेली
धूर्त कोल्हा लबाड लांडगा
हसून वाटून लोणी न्हेली...३
काय कळेना जनतेला
जनता सगळी खुळ्यात निघाली
खेळं बघून राजकारण्यांचा
गेंड ही लाजून लाजून मेली..४
कवि अटलविलास