Bluepad | Bluepad
Bluepad
स्वर्गसे सुंदर : आपले वालचंदनगर
शशिकांत हरिसंगम
शशिकांत हरिसंगम
14th May, 2022

Share

वालचंदनगरच्या पेट्रोल पंपा जवळ येऊन समोर पहिले की लगेच डोळ्यात भरते ' वालचंद नगर जल शुद्धीकरण प्रकिया करून अख्या नगराला पाणी पुरवठा करणारी इमारत - ' आपले वॉटर वर्क्स ' या इमार्तीवरली नजर अशीच उजव्या बाजूला नेली की आपल्या तोंडून पटकन शब्द येतात...' अरे, हे आपले वालचंदनगर हॉस्पिटल ' !
नजर खिळून राहते त्या इमारतीत. आठवणीचे पंख पसरले जातात.आठवते वालचंदनगर आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत बारामती अकलूज परिसरापर्यंत च्या रुग्णांचे निरामय आरोग्याचे आधार केंद्र...' नवल शश्रुषा गृह, शांती सूतिका गृह ' १९३५ -३६ च्या दरम्यान कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची नित्याची काळजी घेण्यासाठी एखादे आरोग्य केंद्र असायलाच हवे असे सेठ वालचंदजींच्या मनात आले. आणिहगमंदिर अजिबात विलंब न लावता उभे राहावे अशी शेटजीची तीव्र मनीषा होती.शेठजीचे हे आव्हान स्वीकारून तत्कालीनप्रमुख. श्री मल्हार गणेश माडगे ह्यांनी अवघ्या काही महिन्याचे आतच ' नवल शश्रुषा गृहाची इमारत उभी केली त्याकाळी कुठलीही बांधकामाची तांत्रिक सुविधा उपलब्ध करण्यास जीवाची अतोनात धावपळ करावी लागायची.
व्यवहारात मराठी भाषेचा आग्रह या बाबत आता कुठे महाराष्ट्र शासनास जाग येऊ पाहत आहे. मराठीचा आग्रह सेठ वालचंदजी यांनी चक्क शंभर - एकशे पंचवीस वर्षा पूर्वी वालचंदनगर उभारणीचे वेळी घेतल्याच्या खुणा वालचंदनगरात फिरताना पावलोपावली दिसतात.
हॉस्पिटलच्या नावापासून हे मराठीच प्रेम डोळ्यात भरते. थोडेसे आत डाव्या बाजूस शांती सूतिका गृहातल्या
' सुतिका कक्ष ', डाव्या हाताला ' क्ष किरण कक्ष, तसेच पुढे ' व्रण घावण ' विभाग म्हणजे आपली ड्रेसिंग रूम. आणखीन पुढे गेले की डॉक्टरांच्या केबिन प्रत्येक केबिनच्या कपाळावर शुद्ध मराठीत पाटी जसे आयुर्वेदिक डॉक्टर त्याच्यासाठी ' वैद्य ' डॉक्टर'ला ' भिषज ' चीफ मेडिकल ऑफिसरसाठी ' भीषगवर्य ' म्हणजे दवाखाण्याचे मुख्य अधिकारी.. ' शास्त्रक्रियागार ' हे मराठी नाव ऑपेरेशन थिएटरसाठी. दवाखान्यातील लॅब ' शरीर चिकित्सा कक्ष ' येथे शरीरातले रक्त, रक्तातील शुगर, कोलेस्ट्रॉल अदीची तपासणी ह्यायची.,बाहेर आले की केस पेपर , औषधं देणे विभाग याला ' औषध दान ' म्हहणजे कंपाऊंडरची खोली यांच्या अर्ध्या भागात हिशोबनीस चोपड्या घेऊन त्यावेळी काळ्यावर पांढरे करीत लिहीत बसलेले दिसायचे.पहिले चीफ मेडिकल ऑफिसर म्हणजे ' भाषगवर्य ' होते डॉक्टर एल डी शहा , त्याची पत्नी त्याही स्त्री रोग तज्ञ दवाखान्यात.आता भारत चिल्ड्रेन्सअकॅडमी ची इमारत आहे तिथे दवाखाना कवार्टर होत्या तेथे दवाखान्यातील स्टाफ डॉक्टर एल डी शहा पतिपत्नी राहत असत.आयुर्वेदिक डॉक्टर जोशी वैद्य स्थूल प्रकृतीचे खणखणीत आवाजाचे त्यांच्या केबिनमध्ये पेशंट पाऊल टाकायचा अवकाश लगेच विचारायचे ' काय काय जास्त खाल्लं काल.? आणि आपल्या उजव्या बाजूच्या ठेवलेल्या खुर्चीत बसायची आज्ञा करत ' काय होतेय ...? ' पेशंटशी बोलत त्यांची चाललेली तपासणी पेशंटला निम्मे बरे करायची. डॉक्टर स के नेऊरगावकर डॉक्टर असेच वृत्ती थोडीशी अध्यात्मिकतें कलतेय असे त्यांच्या हाती तपासण्यासाठी हात दिला की वाटायचे. बोलूनच पेशंटला बरे वाटायचे.डॉक्टर संभूस यांच्या पेशंटच्या एक एक ' दंत ' कथा सरस आणि सुरस. बोलता बोलता अलगत पेशंटचा दात त्यांच्या घशात कधी घालतील पेशंटला कळत नसे. ' नकळत सारे घडले, दुखरे दात अलगद असे हे पडले ' अगदी अस्से होऊन जायचे.. असेच पेशंटला दुखले तरी नाही पाहिजे आणि दात तर धरतीर्थी पडायला हवा. जसे साप तर मेला पाहिजे आणि काठी तर मोडली नाही पाहिजे असले कौशल्याचे काम...तें दात काढणे, कवळी बसवणे, सिमेंट भरणे काम काम इतक्या जवळीकीने करायचे कधी कधी वाटायचे तें जबड्यात उतरून दात काढत नाहीत ना इतकी काळजी.सिमेंट भरण्याचे काम एखाद्या गावंड्या पलीकडे भक्कम असायचे त्यांचे.' संभुसाची चाळ नावाचे एक नाटक त्याकाळी गाजले तें. तें लोकांना खूप
आवडायचे. तितकेच डॉक्टर संभूस लोकप्रिय होते.
'डॉक्टर दामले हे पण असेच पेशंटच्या ' वेगवेगळ्या ' दंत ' कथात स्वतःच्या शैलीत चांदी भरायचे.डॉक्टर व्ही. एम. कांडलकर प्रसन्न व्यक्तीमत्व. असेच ' काही नाही रे दुखायचेच डोके. त्यामुळे ते आहे हे सिद्ध तर होते. ' हॉस्पिटल आणि ग्रामपंयायत तितक्याच कुशलतेने सांभाळायचे. आजार साधा असो की गंभीर त्यांच्या
खळाळून बोलण्याने अंगाला हात लावून तपासण्या आधी बरे वाटायचे. त्यांच्या पत्नी अनुराधा कांडलकर स्त्रीरोग तज्ञ् अडलेल्या स्त्री पेशंटची सहज सुटका करण्यात हातखंडा होता.डॉक्टर हातवळणे साहित्याची जाण असलेला आपल्या बोलण्याने भूल पडणारे ' भुलतज्ञ् ' त्यांची भूल सारे काही सुफळ संपूर्ण करायची.
कंपाउंडर कक्षात असलले व्ही एन शहा, शहा भाभी, करडे आणि ही इथे एक औषध देण्याचे काम करणारे शुभ्र पांढरा शर्ट पायजमा डोक्यावर टोपी घालून गोरे गोरेपण गृहस्थ खूप लोकसंग्रह होता याचा थोडेच पण गोड बोलायचे आणि खोकल्याचा लाल रंगाचा डोस आग्रहाणे द्यायचे. दवाखान्यात कडू औषधाच्या वासात हा आपुलकीचा गोडवा वाटत असायचे. डॉक्टर गुंडावार असेच या कुटुंबातले उजळव्यक्ती. आजार समजावून देत, पेशंटला आजाराबाबत विस्वासात घेत उपचार करावा या विचाराचे डॉक्टर. डॉक्टर कवीश्वर पतिपत्नी याचा हॉस्पिटलच्या कुटुंबात वाढून पंखात बळ घेऊन याच परिसराच्या आभाळात यशस्वी विहार करत असलेले.
किती सांगावे. किती बोलावे कुठलाही व्यावसायिक दृष्टिकोन विचारात न घेता वालचंदनगर कामगारांसाठी उभे राहिलेले हे ' नवल श श्रुषा गृह शांती सूतिका गृह ' हॉस्पिटल १९३६ ते १९१० पर्यंत तब्बल शतकाहुन अधिक वर्षे या पंचक्रोशीतल्या सर्वसामान्यांच्या निरामय आरोग्यासाठी काळजी करत राहिले सदृढ आरोग्य वाटत राहिले हे निश्चित.
स्वर्गसे सुंदर : आपले वालचंदनगर

241 

Share


शशिकांत हरिसंगम
Written by
शशिकांत हरिसंगम

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad