गोष्ट माझ्या बालपणीची
शिंपल्यातल्या लपलेल्या मोत्याची
गहि~या सागर तळाच्या गर्भातली
गोष्ट माझ्या बालपणीची
बंद कुपीतल्या अत्तरासारखी
उघडताच समंध भागात दरवळणारी
ओल्या मातीच्या त्या सुवास सारखी
मनात रुजुन बसणारी गोष्ट
गोष्ट माझ्या बालपणीची
चंदनाच्या शितलते सारखी
रखरखत्या उन्हा नंतरच्या
बेफान वाहणा~या वा~या सारखी
गारवा देणारी गोष्ट
गोष्ट माझ्या बालपणीची
अनवाणी चालत असताना रुतणा~या
त्या काट्यांना
आठवण करुन देणारी त्या पाकळ्यांची
गोष्ट
गोष्ट माझ्या बालपणीची
या धावपळीच्या जगात
दुडदुडणारी , लाडिवाळ पळणारी
पावलांची आठवण करुन देणारी
गोष्ट
गोष्ट माझ्या बालपणीची
तुमच्या बालपणीची...!