* रुखरुख * ०४/०४/२०२२ सोमवार
का? वाढत ती होती
नव्हते मला समजत
तळमळ ही जिवाची
रुखरुख त्या मनाची
वाटले होते मी संपले
नतमस्तक झाले अन
गेले मी चरणी शरण
कृपा ,त्या विधात्याची
टाकले दान पदरात
न भुतो न भविष्यती
थांबे मनीची रूखरुख
आत्मा हा तृप्त झाला
भिऊ नकोस पाठीशी
मी तुझ्या ,राहीन सदा
स्मरण रहा करत माझे,
मज साक्षात्कार हा झाला
कवयित्री : मनिषा कबाडे- मु.पो.जवळे -( ता. सांगोला- जि.- सोलापूर)