Bluepad | Bluepad
Bluepad
जखमा....
Radha dixit
Radha dixit
14th May, 2022

Share

खरंच का जखमा इतक्या हळव्या असतात.कि अगदी मंद झूळूक जरी आली तरी विव्हळतात....कारण त्या मनाला झालेल्या जखमा असतात.कोणत्याही औषधाने, मलमपट्टीने भरुन न निघणाऱ्या ....खरंतर या होतात आपल्याच आणि आपणच नकळत केलेल्या चूकांमूळेच पण सहसा आपल्या ते लक्षात येत नाही...आणि मग आपण त्या कूरवाळत बसतो...कारण त्या बहुतांशी चूका प्रेमात ,आपल्या जिवाभावाच्या माणसांच्या काळजीतच होतात...आणि ती ही आपण इतकी करतो कि त्यात आपण आपली किंमत कधी शून्य करून घेतली आपल्या देखील लक्षात येत नाही...बाकी काही म्हणा, तुम्ही किती चांगले राहिलात आणि कितीही नम्रपणे राहिलात तरी दुःख यातना घूसमट आणि कमजोर यांच्या बळीचा बकरा तुम्हीच होता....जितकं आपण नात्यात प्रेमात हतबल,हताश,निराश ,होतो न....जगात कोणत्याही बाबतीत होत नाही तितकच खरंय .. पण हे नातं,प्रेम इतकंसहजासहजी पण आपण झिडकारु शकत नाही न....कारण माणूस म्हणून जन्माला येतो तेव्हाच या अशा प्रकारच्या संवेदना ,भावना, नाळेसोबत जोडलेल्या असतात.
आपण फक्त त्या मिळालेल्या दुःखातून बाहेर येण्याचा प्रयत्न करायचा हळूवारपणे जखमांना घाव घालून घालून इतकं सहनशील बनवायचं कि येणारी दुःखाची लाट ही त्या कणखर जखमांना पाहून विचार करेल कि घाव कुठे घालू??? अहो खरंच इतकं कणखर व्हा. मग बघा कि कोणतही वाईट वेळ, परिस्थिती, दुःख, तुमचं काहीही वाईट करु शकणार नाही.....नव्याने सुरुवात करा. जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही.....
सौ.राधा दिक्षित.

223 

Share


Radha dixit
Written by
Radha dixit

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad