दारुचे व्यसन ही केवळ वाईट सवय नसून तो एक रोग आहे दारू पिणारा हा माणूस मद्दपाश ( अल्कोहोलीझम) ह्या आजाराला बळी पडतो मौज म्हणून चारचौघे एखाद्या वेळी जेवढी दारू पितात त्यापेक्षा हा रोगी जास्त प्रमाणात आणि सतत दारू पित असतो केवळ दारू पिण्याच्या अतिरेकामुळे त्याची आर्थिक; शारीरिक; मानसिक व शारीरिक हानी होत असते तरीही तो दारू पितो राहतो असा माणूस ह्या रोगाचा बळी ठरलेला आहे असे समजावे आणि हे तेवढंच सत्य आहे कारण हे सर्व माझ्यासोबत घडलेलं आहे