Bluepad | Bluepad
Bluepad
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी .
R
Rajesh Bhosale
14th May, 2022

Share

आईच्या चपलांची किंमत एक मुलगा आपल्या पहिल्या पगारातून आपल्या आईसाठी चप्पल खरेदी करण्यासाठी दुकानात जातो दुकानदाराला लेडीज साठी चप्पल दाखवा ना अशी विनंती करतो दुकानदार पायाचे माप विचारतो मुलगा सांगतो माझ्याकडे माझ्या आईच्या पायाचे माप नाही पण पायाची आकृती आहे त्यावरून चप्पल देऊ शकाल का दुकानदाराला हे अजबच वाटले दुकानदार म्हणाला या आधी कधी आकृती पाहून चप्पल आम्ही कधीच दिली नाही त्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईला घेऊन का येत नाही मुलगा सांगतो माझी आई गावाला राहते आजवर तिने कधीच चप्पल घातली नाही माझ्यासाठी मात्र खूप कष्ट घेऊन तिने माझे शिक्षण पूर्ण करून दिले आज मला माझ्या नोकरीचा पहिला पगार मिळाला आहे त्यातून आई साठी भेट म्हणून मी चप्पल घेणार आहे हे ठरवूनच मी घरून निघताना आईच्या पायाची आकृती घेतली होती असे म्हणत मुलाने आईच्या पावलांच्या आकृतीचा कागद दुकानदाराला दिला दुकानदाराचे डोळे पाणावले त्याने साधारण अंदाज घेत या मापाच्या चपला दिल्या आणि सोबत आणखी एक जोड घेत म्हणाला आईला सांगा मुलाने आणलेल्या चपलेचा एक जोड खराब झाला तर दुसऱ्या मुलाने भेट दिलेला जोड वापर पण अनवाणी फिरू नकोस हे ऐकून मुलगा भारावला त्याने पैसे देऊन चपलांचे दोन्ही जोड घेतले आणि तो जायला निघाला तेवढ्यात दुकानदार म्हणाला तुमची हरकत नसेल तर आईच्या पायांची आकृती असलेला कागद मला द्याल का मुलाने प्रतिप्रश्न न करता तो कागद दुकानदाराला दिला आणि तो निघाला दुकानदाराने तो कागद घेऊन आपल्या दुकानातल्या देवघरात ठेवला आणि श्रद्धापूर्वक नमस्कार केला बाकीचे कर्मचारी आवक झाले त्यांनी कुतुहलाने दुकानदाराला तसे करण्यामागचे कारण विचारले तेव्हा दुकानदार म्हणाला ही केवळ पावलांची आकृती नाही तर साक्षात लक्ष्मीचे पावले आहेत ज्या माऊलीच्या संस्काराने या मुलाला घडवले यशस्वी होण्याची प्रेरणा दिली ही पावले आपल्या ही दुकानाची भरभराट करतील याची खात्री आहे म्हणून त्यांना देवघरात स्थान दिले अशा रीतीने प्रत्येकाने जर आपल्या आईची किंमत ओळखली आणि तिचा योग्य सन्मान केला तर खऱ्या अर्थाने परमेश्वराची सेवा होईल...
🌹🙏🌹

115 

Share


R
Written by
Rajesh Bhosale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad