Bluepad | Bluepad
Bluepad
किमयागार -प्रवासातील घटना
Girish
Girish
14th May, 2022

Share

प्रवासातील घटना.
काही वेळा दुसरा प्रवासी तांडा भेटत असे. व एकमेकांना हव्या असलेल्या वस्तू त्यांना मिळत असतं.जणूकाही त्या लिहून ठेवल्या आहेत. काही वेळा काही टोंपी घातललेली विचित्र वाटणारी माणसे येत असत त्याना बदाऊन म्हणत.
ते तांडा प्रवास करत असलेल्या मार्गावर तपासणी करत व तांडामालकाला मार्गावरील माहिती देत.
चोर दरोडेखोरांबाबत माहिती देत. ते नेहमी पूर्ण काळे कपडे घालून येत व त्यांचे फक्त डोळे दिसत. एका रात्री एक उंटचालक, इंग्रज व मुलगा शेकोटी जवळ बसले होते तेथे आला व म्हणाला की, येथील जमातींमध्ये लढाई सुरू झाली आहे असे कळते. तीघेही शांत बसले. मुलाच्या लक्षात आले की, जरी ते एकमेकांशी बोलत नसले तरी, वातावरणात एक भीतीची लहर आली आहे. परत एकदा शब्दरहित वैश्विक भाषेचा अनुभव तो घेत होता. इंग्रजाने विचारले
' घाबरण्याचे काही कारण नाही ना? ' उंटचालक म्हणाला, एकदा तुम्ही वाळवंटात प्रवेश केलात की परत मागे जाणे शक्य नसते. उत्तम मार्ग म्हणजे सर्व काही अगदी संकटांची भिती पण " अल्लाहवर " सोपवून निर्धास्तपणे पुढे जात राहणे. व जाताना त्याने तो गुढ शब्द उच्चारला
' मक्तुब '.

169 

Share


Girish
Written by
Girish

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad