सूर्यासम तेजस्वी कांती,
कर्तृत्वात शौर्य
असा तो महापराक्रमी शिवबाचा छावा होता
साम्राज्यासाठी लढण्या सज्ज असा तो पराक्रमी राजा
कलेचा पुजारी होता
वयाच्या चौदाव्या वर्षी चं लिहिला
बुदधभूषण नाम ग्रंथ
साम्राज्यासाठी ४० दिवस मृत्यूशी झुंज दिली शंभूराजेंपूढे औरंगजेबाने ही शरणागती पत्करली.
वेदना ही हळहळल्या, मृत्यू ही ओशाळला
४० दिवस रोज मृत्यूला हरवून
साम्राज्यासाठी राजेंनी बलिदान दिले
सह्याद्रीच्या कड्याकपारी
आजही त्यांच्या शौर्याच्या गाथा सांगतो
मृत्यूवर पराजय मिळवणाऱ्या आपल्या शंभूराजेंपुढे
इतिहास ही नतमस्तक होतो..