Bluepad | Bluepad
Bluepad
अंगणातील मोगरा
मयुरी_व.सु._जोशी
मयुरी_व.सु._जोशी
14th May, 2022

Share

मोगरा..
माझ्या अंगणात अंदाजे आठ ते दहा वर्षापासून सुगंध दरवळीत करणारा, प्रसन्नता देणारा.. मोगरा..!
अंगणातील मोगरा
मी लहानपणापासून अंगणात हा मोगर्‍याचा वेल पाहते. 11 ते 12 फूट उंच डेलेदार असा हा वेल. सुंदर अशा पाच पाकळ्यांचे फुल..
झाडे लावण्याची आवड असल्याने नेहमी निरीक्षण करत असे. पावसाळ्यात हिवाळ्यात फुले थोडी जास्त येतात आणि उन्हाळ्यात कमी येतात..
तसं मला झाडांची आवड आईमुळे.. तिला झाडं लावायला त्यांचे संगोपन करायला खूप आवडतं. एकदा सहज मी आईला विचारलं,"आई हा वेल कोणी लावला गं लहानपणापासून पाहते.."त्यावर आई म्हणाली,"हा वेल तुझ्या आजीने लावलाय.. मला काय आश्चर्यच वाटलं किती जुना वेळ आहे हा तरीही इतका टवटवीत, आनंदात डोलतोय..
सकाळी अंगणात तर फुलांच्या पायघड्याच.. काळ्या मातीवर पांढऱ्या फुलांचा गालिचा पसरलेला.. तुळशी वर काही फुले अडकलेली.. महादेवावर निसर्ग कडूनच वाहिलेली फुलं.. अशीही नयनरम्य सकाळ!!🌄
देवाला प्रिय असे स्वर्गाहुन आलेला हा मोगर्‍याचा वेल.. मी दररोज याचे फुलं वेचते. त्याचे हार करते. नंतर ते हार देवाला अर्पण झाल्यावर मन प्रसन्न होत. आणि आणि हेवा वाटायचा की किती नाजूक हे फुल पण पूर्ण घराचं वातावरण प्रसन्न करते..
अंगणातील मोगरा
मंगळागौरी आणि हरतालिकेला मोगर्‍याचा हार असे.. हरतालिकेला तर स्टीलच्या गंजावर काजळी घेऊन महादेवाची पिंड बनवून त्या भोवती मोगऱ्याच्या फुलांचा हार पाहून मन प्रसन्न वाटते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.. संध्याकाळी वेलावर फुलांची कळी जणू मोती भासे.. आणि जसा अंधार पडेल तसे ते फूल उमले..
रात्रीच्या काळोखात तर वेलावरची फुलं जणू शुभ्र पांढऱ्या चांदण्या आमच्या अंगणात उतरल्यासम वाटे.. रात्रीच्या मंद वाऱ्याने मोगर्‍याचा सुगंध दूरवर पसरत असे..
असा हा माझ्या अंगणातील मोगर्‍याचा वेल..

238 

Share


मयुरी_व.सु._जोशी
Written by
मयुरी_व.सु._जोशी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad