भक्ती एखाद्या देवाबद्दल / देवीबद्दल, बुवांबद्दल, देशाबद्दल, पक्षाबद्दल, संघटनेबद्दल, व्यक्तीबद्दल असू शकते. अर्थात ती गोष्ट आपल्याला प्रिय असते हे ओघाने आलं. कोणाची भक्ती आंधळी असते तर कुणाची डोळस.अध्यात्मिक मार्गात नववीधा प्रकार सांगितले आहेत. अर्थात सर्व सामान्य व्यक्ती इतक्या खोलात जात नाही. त्याची भक्ती वरवरची
असते.काहींची भक्ती मनापासून असते. त्याचा त्याना फायदा होतो. वारकरी भक्ती भावनेने पंढरपूरची वारी सातत्याने करत असतात. जरी काही भवतीक लाभ झाला नाही तरी मानसिक लाभ नक्कीच होतो. सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपल्या पाठशी दैवी बळ आहे अशी खात्री होते, काहीना तसा अनुभव पण येतो. प्रत्येक क्षेत्रात लबाड माणसं असतात तशी याही क्षेत्रात आहेत. बुवाबाजीच्या नावाखाली ते भक्तीचा बाजार मांडतात. आंधळे भक्त त्यात फसतात आणि आर्थिक शोषण, लैंगिक शोषण ह्याचे बळी होतात. नंतर पश्चाताप होतो. पण वेळ निघून गेलेली असते.आंधळी भक्ती असेल तर एक प्रकारची नशा चढते. आणि त्यात योग्य, अयोग्य, चूक, बरोबर याच भान रहात नाही. भक्ती, श्रद्धा हे जवळपासचे शब्द आहेत. साधारणता 5 हजार वर्षांपूर्वी महाभारत होऊन गेलं. त्याच्या युद्धात श्रीकृष्ण याने अर्जुन ला केलेला उपदेश म्हणजे 'भगवत गीता ' जो ग्रंथ हिंदू धर्मात पवित्र मानला जातो, वंदनीय मानला जातो. कोर्टात गितेवर हात ठेवून शपथ घेतली जाते.आणि एकदा भक्ती जडली की त्यात अतिशयोक्ती, विपर्यास होत राहते आणि जसा काळ जाईल तशी त्यात भर पडत जाते. खास करून आपल्या काही देवांबद्दल, देवींबद्दल असा बराच विपर्यास झाला आहे. उदा. चार हात असणं, आठ हात असणं, तीन तोंड असणं, दहा तोंड असणं इत्यादी. आणि कवी, लेखक कल्पनेने आणखीन भर टाकत जातात.भक्ती शुद्ध पाहिजे, त्यात स्वार्थ नसला पाहिजे. अशी भक्ती फळाला येते. भक्ती मुळे एक प्रकारची मानसिक शक्ती प्राप्त होते ही गोष्ट खरी आहे. पण भक्ती, पूजा, आरती, होम, हवन याचा अतिरेक करू नये. वर्तमानाकडे लक्ष ठेवलं पाहिजे नाहीतर समाजाचं, देशाचं नुकसान होतं हे आपल्या इतिहासावरून दिसून येतं.