घमंड
घमंड करणं सोडून दे माणसा
इथे काही कुणाचं नाहीये...
आलो तस जाणार आहे
पैसा सोबत नेणार नाहीये...
जन्माला आलोय तस
एक दिवस जाणार आहे...
रिकाम्या हाती आलोय
रिकाम्या हाती च जाणार आहे...
सगळ्यांशी समान वागणं सोडून
मी च श्रेष्ठ म्हणत आहे..
सगळ्यांना मदत करायची सोडून
माझं माझं म्हणत आहे...
बघ एकदा तूच माणसा
काय नक्की तुझ आहे..
आपलं आपलं म्हणाऱ्यांपैकी
श्वास फक्त तुझा आहे...
प्रेम आपुलकी दे सगळ्यांना
सर्वांशी समान वागत जा...
संकटात केली मदत ज्यांनी तुला
त्यांना तू आठवत जा..
माझं माझं करता करता
सगळं सोडून जाणार आहे...
सगळं संपणार आहे तेव्हा
देह तेवढा उरणार आहे....
- तुमचा विकास
( कविता आवडल्यास like, share आणि follow करायला विसरू नका )