Bluepad | Bluepad
Bluepad
Title

Nikita Surnar
Nikita Surnar
14th May, 2022

Share

सवयच काय, आयुष्यात कुठल्याही बाबतीत जेव्हा तुम्ही, रिझल्ट चा विचार न करता प्रोसेस एन्जॉय करायला शिकाल तेव्हा काहीही झाले तर निराशा तुमच्या पदरी पडणार नाही…
चांगल्या सवयी लावणं आणि वाईट सवयी मोडणं हे सोप्प करून घेण्यासाठी हा लेख वाचा.
आपली सर्वांची इच्छा असते की आपल्याला चांगल्या सवयी लागाव्यात.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सुदृढ शरीर चांगलं करियर भरपूर पैसा ही आपली स्वप्न असतात.
पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या सवयी अंगीकाराव्या लागतात, त्या सवयी आपल्यामध्ये रुजणं हे काही सोपं नसतं…
यात सवयींच्या पॅटर्नच्या अभ्यासावरून २१-९० चा नियम बनवला गेला आहे.
चला तर मग, या नियमा ला समजून घेऊन चांगल्या सवयी स्वतःला लावून घेणं सोपं कसं होईल ते या लेखात बघू…
२१-९० चा नियम काय सांगतो
आपली मेंटॅलिटी, आपला माईंडसेट, आपल्यातला आळस आणि आपला स्वभाव आपल्याला चांगल्या सवयींपासून दूर नेतात आणि आजचा प्रयत्न आपण उद्यावर ढकलतो…
आपल्याला चांगल्या सवयींचे फायदे तर हवे असतात, पण त्यासाठी करावी लागणारी मेहनत करणं मात्र आपल्यासाठी कठीण होऊन जातं.
आणि यासाठी गरज असते मेंटॅलिटी बदलण्याची…
सवयींच्या बाबतीत असंही होतं की, ‘अरेरे, आज राहून गेलं, पण उद्या मात्र मी नक्की करेल’ पण अशा वेळी आपण हे विसरून जातो, की कालही आपण हेच स्वतः शी बोललेलो असतो.
आणि यासाठी गरज असते सजगपणे जवाबदारी घेण्याची…
२१-९० च्या नियमानुसार आपल्याला कुठलीही चांगली सवय लागायला किंवा वाईट सवय मोडायला २१ दिवस लागतात आणि मग तीच आपली लाइफस्टाइल बनायला ९० दिवस लागतात.
तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर चांगल्या सवयी लावून त्या सवयी आपली लाइफस्टाइल बनवणं हे सर्वात गरजेचं असतं…
अशा वेळेस चांगल्या सवयी लावण्यासाठी आणि त्या सवयी लाइफस्टाइलचा भाग बनवण्यासाठी हे तीन नियम लक्षात घ्या
१) एका छोट्या पण सोप्या सवयी पासून सुरुवात करा: कुठलीही सवय एका झटक्यात लागत नाही म्हणून मोठे ध्येय मिळवण्यासाठी छोट्या छोट्या सवयी लावून घेण्यापासून सुरुवात करा.
उदाहरणार्थ, जर तुम्हाला रोज एक तास व्यायाम झालाच पाहिजे असे वाटत असेल तर, रोज थोड्या थोड्या सूर्यनमस्कारांपासून सुरुवात केली तर तुमच्या शरीराला लवचिकता येऊन पुढचा व्यायाम हळूहळू वाढवणं सोपं होईल.
२) त्यापासून काय मिळवायचं ते ठळकपणे लिहून ठेवा: तुम्हाला चांगली सवय लावायची आहे किंवा वाईट सवयी मोडायची आहे पण ती कशासाठी… हे तुमच्या घरात, तुमच्या बेडरूम मध्ये तुम्हाला नेहमी दिसेल असं ठळक शब्दांत लिहून ठेवा.
हे करण्यामागचा तुमचा मोटीव्ह तुमच्या डोळ्यांसमोर असू द्या…
या २१ आणि ९० दिवसांच्या प्रवासात हे, सारखं डोळ्यांसमोर दिसणारं कारणच इंधन बनेल… तुमची सवयीबरोबरची गाडी भन्नाट पळवण्यासाठी!!
३) ते २१ दिवस पण एन्जॉय करा: खरंच सवय लागली तर तुमच्यामध्ये काय चांगला बदल होणार आहे, यासाठी तुम्ही एक्साईट असता, तसंच सवय लावून घेण्याचे जे २१ कठीण वाटणारे दिवस असतात ते एन्जॉय करा.
सवयच काय, आयुष्यात कुठल्याही बाबतीत जेव्हा तुम्ही, रिझल्टचा विचार न करता प्रोसेस एन्जॉय करायला शिकाल तेव्हा काहीही झाले तरी निराशा तुमच्या पदरी पडणार नाही…
बघा, आहे की नाही सोप्पं…
अशीच एखादी सवय आहे का? जी तुम्हाला लावून घ्यायची किंवा सोडायची आहे?
हा प्रवास अगदी २१ आणि ९० दिवसंचाच असेल, असंही नाही…
पण हार न मानता, सतात्त्य ठेवणं तुम्हाला जमलं पाहिजे… शेवटी याच तर गोष्टी जगण्यात रंगत आणतात…

0 

Share


Nikita Surnar
Written by
Nikita Surnar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad