Bluepad | Bluepad
Bluepad
दिवसातून फक्त 1 तास!
नेहा
नेहा
14th May, 2022

Share

गेल्याकाही वर्षात आणि कोविड सारख्या महामारीने आपल्या सगळ्यांना चांगल्या आणि सुदृढ आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. फक्त सकस आहार खाणे हेच नाही तर व्यायामाची ही नितांत गरज आपल्या शरीराला आहे. त्याच बरोबर या काळात आपल्याला मानसिक आरोग्याच महत्त्व कळलय. शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योग अतिशय गुणकारी आणि उपयुक्त आहे.
योग याविषयी असलेला सामान्य गैरसमज म्हणजे योग फक्त शरीराच्या लवचिकतेवर लक्ष केंद्रीत करतं तथापि योग आणि योगासने हे मुद्रा संलेखन, स्नायूंची ताकद, सहनशक्ती तसेच स्थिरता यावर जोर देते. याच बरोबर एकाग्रता, ध्यान आणि लक्षपुर्वक श्वसन पद्धत याला ही महत्त्व देते.
असंसर्गजन्य रोग हे जगभरातील जास्तीत जास्त मृत्युंच कारण ठरत आहे. WHO सांगते की, असंर्गजन्य रोगाचे प्रमुख 4 कारणं आहेत- हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कर्करोग, मधुमेह आणि श्र्वासनाविषयक आजार. शारीरिक रोगांबरोबरच मानसिक आजारांचे प्रमाण ही झपाट्याने वाढत आहे. शारीरिक आजारांकडे आपण थोड्या प्रमाणात जागृत आहोत, परंतु मानसिक आजाराविषयी अजून हि खूप गैरसमज आहेत. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तणाव हा प्रत्येकाच्या आयुष्याचा नकळतपणे भाग झालाय. कामाच्या ठिकाणी असलेला ताण, कौटुंबिक चिंता, निराशा, अपुरी झोप, खाण्याच्या सवयी, सततची स्पर्धा व चढाओढ, आर्थिक समस्या किंवा ट्रॅफिक जॅम सारख्या गोष्टींमुळे ही आपल्या तणाव येतो. प्रत्येक तणावाचे प्रतिकूल परिणामच असतात असं नाही, जेव्हा शरीर ताण सहन करण्यास सक्षम असेल तेव्हा त्याचा परिणाम त्या व्यक्तीची कामगिरी वाढवण्याचे काम तो ताण करतो. सकारात्मक परिणाम हे प्रभावी असतात. परंतु ताण तणाव जेव्हा नकारात्मक होतो, त्यावेळी तणावाला समोर जाण्याची क्षमता कमी होते आणि मग यामुळे शरीर थकू लागतं व याचा विपरीत परिणाम शरीर आणि मनावर दिसू लागतो. ताण तणावामुळे डोके दुखी, पाठ दुखी, उच्च रक्तदाब, निद्रानाश, नैराश्य, चिंता, मायग्रेन, थकवा अश्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता तीव्र असते.
परंतु यासगळ्यावर योगासन, प्राणायाम आणि ध्यान हे अत्यंत फायदेशीर ठरल्याचे योगिक अभ्यासात दिसून येते.
आपण आता योगीक संकल्पाने विषयी जाणून घेऊ.
- योग आणि योगासन अनेक चिकित्सक समस्यांना प्रतिबंध घालून त्या आजारांवर संभाव्य उपचार देखील करतं.
- योग चिक्तित्सा ही एक चैतन्य असलेली शारीरिक आणि मानसिक अवस्था असून शरिराचा अध्यात्मिक विकास ही करते.
- योगासन आणि प्राणायाम सतर्कता आणि सकारात्मक भावना वाढवते व नैराश्य, आक्रमकता आणि चिंतेची नकारात्मक भावना कमी करण्यास मदत करते.
- बहुतांश लोक कळत नकळतपणे नैराश्य सारख्या नकारात्मक भावनेत जगत आहेत, यावर योग हा अंतिम आणि उत्तम पर्याय आहे.
- 'स्वास्थ्य' याच्या योगिक व्याख्यानुसार जेव्हा शरीर आणि मन सुसंगत पणे कार्य करतात तेव्हा आपल्याला 'आत्मसाक्षात्कार' म्हणजेच Self-Realisation होण्यास मदत होते.
- एका इंग्रजी वाक्यात अतिशय सुंदर म्हणलंय, "When you are really your 'Self' you truly at 'Ease' and it is Loss of Self that Creates 'Dis-Ease'." म्हणजेच की जेव्हा तुम्हाला तुमच्यातला 'स्व' गवसतो तेव्हा तुम्ही अत्यंत आरामात आणि समाधनात असता आणि हाच आजार निर्माण करणाऱ्या 'स्व' चा विनाश आहे.
- पाश्यात्य आरोग्य संकल्पनेनुसार स्वास्थ्य, निरोगी आरोग्य म्हणजे 'आजारांची अनुपस्थिती' पण याउलट योगिक संकल्पना सांगते की 'चैतन्यशील, आनंदी आरोग्याचा अभाव म्हणजे आजार!
- ध्यान सराव केल्याने मेंदूची रचना आणि कार्य दोन्ही सुधारण्यात मदत होते.
- ध्यान केल्याने आपण आपल्या स्व च्या जवळ येण्यास मदत होते, मानसिक आरोग्य सुधारते. उच्च रक्तदाब, नैराश्य, डोके दुखी, निद्रानाश सारखे आजार बरे होण्यास याची मोठी मदत होते.
- कामावरची एकाग्रता, आत्मिक शांती, भावनिक स्थिरता, रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
योगचे आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे. शरीर आणि मन स्थिर, सुदृढ असेल तर बाकी गोष्टींना अर्थ आहे. अलीकडेच झालेल्या अभ्यासात दिसून आले की, 14 दिवस 20 मिनिट दररोज फक्त सूर्यनमस्कारच्या 12 मुद्रा केल्याने शारीरिक विश्रांती, मानसिक शांतता, ताजेतवाने वाटणे आणि सगळ्यात महत्वाचे आनंद असे सकारात्मक परिणाम दिसले. अश्या प्रकारे अनेक संशोधनातून आणि अभ्यासातून योगाचे महत्त्व आपल्याला समजते. शाळकरी मुले, महाविद्यालयातील विद्यार्थी यांना ही योग आणि ध्यान याने फायदा होतो, अभ्यास लक्ष लागते, मन स्थिर राहत आणि त्यामुळे अभ्यास उत्तम होतो.
दिवसातून फक्त 1 तास वेळ काढून रोज व्यायाम, ध्यान करण्याचा प्रयास प्रत्येकानी करूया आणि सुदृध आरोग्य मिळवूया!

110 

Share


नेहा
Written by
नेहा

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad