स्वयंभू नेते
आपल्याच कौतुकाचे
किती लावावे आपण झेंडे
स्वयंभू जाती धर्मात
जन्मू लागले राजकीय गेंडे...१
सोडून जन लाज सारी
गाई स्वत:चेच पोवाडे
कुणी झाले जात वेडे
कुणी जाहले धर्म वेडे ...२
कुणी सांगा रे यांना थोडे
कवि मारतील शब्दं जोडे
तरी लाजतील ना हे घोडे
दाखवत राहतील अंगचे तिडे...३
कवि अटलविलास