माणूस हा माकडाचा वंशज आहे असे म्हणतात.. त्यामुळे काही वेळा तो माकडासारखा वागतो असे वाटते.. म्हणजे माकडा समोर एका बाजुला केळे ठेवले आणि एका बाजूला दहा रुपयाची नोट ठेवली तर ते पहिल्यांदा केळ उचलेल कारण पैशाने जास्त केळी येवू शकतात याच प्रशिक्षण त्याला कुणी दिलेल नसते.. नाराज नका होऊ पण प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं ही सध्या तसचं झालयं.. शाळेत शिक्षणाबरोबर व्यावसायीक संधी ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नसते त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यावर आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पैसा मिळवण्याचा पहिला मार्ग कुठला?.. तर.. नोकरी.. किंवा ती नाहीच जमली तर मग एखादा छोटासा धंदा.. सहजपणे आठ ते दहा तास काम करुन पैसा मिळवता येतो.. जास्त पैसे हवेत तर जास्त काम करा.. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी काम करुन पैसा मिळवा.. पण आयुष्यात स्थिरता मिळवण्यासाठी पैशाचा विनियोग कसा करायचा ते मात्र प्रत्येकाने आयुष्य जगताना शिकायचे, त्यामुळे होते काय.. गरज असताना किंवा नसताना सुद्धा पैसा खर्च केला जातो.. हो, कारण पैसा हा गरजांवर खर्च करण्यासाठी असतो असा बहुतेकांचा गैरसमज.. गरजा वाढतच असतात आणि पैसा खर्च होत असतो.. परंतु आपले किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पर्याप्त पैसा नसतो.. श्रीमंत श्रीमंतच होत राहतात आणि गरीब गरीबच राहातात, याला कारण आपली शिक्षण पद्धती.. "भरपुर शिका आणि काम करुन पैसा मिळवा".. पण फक्त गरजांसाठीच पैसा कमवायचा असेल तर कोरोनामुळे आलेल्या बेरोजगारीमुळे महागाईच्या काळात आपल्या वाढत्या गरजा लक्षात घेता त्या पुर्ण करण्यासाठी आपल्या उत्पन्नात वाढ व्हायला हवी आणि त्यासाठी काय करता येऊ शकते.. असा विचार आपल्या मनात कधी आलाय का?..
नसेल तर.. पैसा कमवता कमवता फायनान्शियल फ्रिडम म्हणजे काय?.. हा प्रश्न स्वतःला विचारत रहा.. कारण, फायनान्शियल फ्रिडम नसलेले आयुष्य म्हणजे एक प्रकारची गुलामगिरी..