Bluepad | Bluepad
Bluepad
ज्ञान हाच देव 🙏🙏🙏
Vilas Thakur
Vilas Thakur
14th May, 2022

Share

देव म्हटलं की आपल्याला गणपती हनुमान शंकर हे देव आठवतात. कारण ते सर्व ठिकाणी नजरेच्या टप्प्यात कुठेना कुठे वसलेले असतात. परंतु ज्ञान हाच देव आहे हे मानणारे भरपूर कमी लोक आढळतील.आज या जगात ज्ञान म्हणजे शिक्षण हे ज्ञान नाही तर काही नाही अशी परिस्थिती झाली आहे.
आपल्या भारत देशात मुख्यत्वेकरुन आपल्या महाराष्ट्रात तर अगणित संत होऊन गेले हे सर्व ज्ञानी संत आपल्या देशात ज्ञान वाटायचं काम करायचे. आपली ही महाराष्ट्र भूमी ही अशा संतांमुळे पावन झाली या ज्ञानातच तर देव दडलेला आहे
देव मंदिरात नाही मशीदीत गिरीजाघरात नाही तर ज्ञानात आहे हे याच संतांनी आपल्याला पटवून दिले. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली रेड्याच्या तोंडून वेड पढवून घेतले ते या ज्ञानाच्याच आधारे.
ज्ञानामुळे माणूस हा एक दिव्य पुरुष बनतो. म्हणून ज्ञान हे आवश्यक आहे. आताचे ज्ञानी पुरुष हे ढोंगी आहेत असं म्हणता येणार नाही पण लोकांच्या अज्ञान पणाचा फायदा कित्येकानी घेऊन आपली पोळी शेकून घेतली आहे. आणि असे हे अज्ञानी लोक त्यांच्या त्या फसव्या रुपाला भाळून त्यांच्या तिजोऱ्या भरत आहेत.
आपण माणसं ओळखायला शिकलं पाहिजे कोण ज्ञानी आणि कोण फसव्या हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोवर आपण फसत राहणार.
ज्ञान हाच देव 🙏🙏🙏

108 

Share


Vilas Thakur
Written by
Vilas Thakur

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad