Bluepad | Bluepad
Bluepad
जाणीव नात्याची
A
Anita Gaikwad
14th May, 2022

Share

आज रविवार होता सूटटी चा दिवस,सकाळचे आठ वाजले होते.मूल झोपली होती. अस्मिता चे डोळे उघडत नव्हते.आज ऑफिसला सूटटी होती म्हणून नेहमी पेक्षा आज ती एक तास जास्त झोपली होती. रोजच्या कामामूळे धावपळीने थकवा आला होता.पण बायकांना कूठे विश्रांती मिळते.डोळे चोळत उठली.तोंडावर पाणी मारलं.नि आंघोळ करण्यासाठी बाथरूम कडे वळाली.नेहमी पेक्षा आज तिला काहीतरी वेगळं जाणवलं.आंघोळ आटपून ती अंगणात गेली.झाडू मारु म्हणून झाडू शोधू लागली पण झाडु नेहमी च्या जागेवर नव्हता.ती इकडे तिकडे बघू लागली. पण काय आश्चर्य अंगण स्वच्छ झाडलेल होत. अस्मिता विचार करु लागली.जादु झाली की काय तिला काही कळेनासं झालं एवढ्या सकाळी अंगण कोण झाडून गेलं म्हणून नवऱ्या ला कूतहूलाने सांगायला घरात आली.पण तो उठून केव्हाच फिरायला गेला होता. अस्मिताला कोडे पडले मग ती स्वंयपाक घरात गेली.पिण्याचे पाणी भरू म्हणून हंडा घ्यायला गेली अरे काय आश्चर्य हंडा पाण्याने स्वच्छ भरलेला होता मी स्वप्न तर नाही ना बघत स्वताशी ची बोलली आज पहिल्यांदाच तिला काहीतरी वेगळं जाणवत होतं.नाश्ता बनवावा म्हणून पोह्यांचा डबा काढायला गेली.आणि बघते तर काय पोहे पण तयार होते.आता मात्र तिला खूपच आश्चर्य वाटले.आणि आता तिने नवऱ्याला फोन करू म्हणून मोबाईल हातात घेतला तर काय आश्चर्य नवरा समोर उभा राहिला.मग तिने त्याच्याकडे आश्चर्य ने बघितलं अहो आज काय एक एक आश्चर्य मला बघायला मिळते.नवरा गालात हसला.अहो हसता काय कसं वाटलं सरप्राइज? म्हणजे म्हणजे ही काम हो आज सगळी कामं मी आणि मूलांनी केली.काय तेवढ्यात मूलं आली आणि आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आईच्या पाया पडले.आज अस्मिता चा पसतिसावा वाढदिवस होता.कामाच्या गडबडीत ती स्वताचा वाढदिवस सुद्धा विसरली होती.पण तिच्या मूलांनी आणि नवऱ्याने तिला वेगळे सरप्राइज देण्याचे ठरविले होते.आज तिघे लवकर उठले होते आणि तिच्या उठण्याच्या आधी सगळी कामं करून झोपण्याचे नाटक करून आंथूरणावर पडले होते व नवरा बाहेर फिरायला गेला होता.सगळं बघून अस्मिता चे डोळे भरून आले.तिच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले.आज तिला माहेर ची आठवण झाली.इतक्या वर्षात तिला आज वेगळे सरप्राइज मिळाले होते. ती मनातून सूखावली होती.काम केली होती म्हणून नाही तर तिची आज सगळ्या नी जाणीव केली होती.तिने प्रेमाने मूलांना जवळ घेतले.नवऱ्या च्या हात हातात घेतला.आज तिचा आनंद गगनात मावत नव्हता.नवरा बोलला अगं तू नेहमी आमच्यासाठी राबते घर सांभाळून ऑफिसला जाते.एक दिवस आम्ही तूझं ओझं थोडं कमी केलं बसं इतकंच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले.वाढदिवस आनंदात साजरा झाला.मित्रानो आपल्या घरात पण आई, बहीण, पत्नी च्या रूपाने एक अस्मिता आहे तिला पण कधीतरी असं सरप्राइज द्या.तिच्या चेहऱ्यावर चा आनंद बघा तिच्या कष्टाची जाणीव ठेवा.

240 

Share


A
Written by
Anita Gaikwad

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad