Bluepad | Bluepad
Bluepad
शोध.. देवाच्या अस्तित्वाचा...1
धनश्री अजित जोशी
14th May, 2022

Share

खरंच देव आहे का?
" अग आज माझा उपास आहे."
" आता आज कसला उपास? काल झाला ना? "
: अग काल एकादशीला होता.आज शनिवार.."
"आई, बस्सकर हे उपास तापास, आता शनिवार चे काय नवीन फॅड आहे? "
" अग साडेसाती सुरू होतीय तुला.."
शोध.. देवाच्या अस्तित्वाचा...1
" मग तू उपास करून काय होणार? नसता बावळट पणा..त्या शनिवाला काय एवढेच काम आहे..लाखो लोकांची साडेसाती सुरू झाली असेल तो कोणा कोणाचा हिशोब ठेवणार आहे? "
" अग असे बोलू नये."
" आई ,अशाने तू आजारी पडशील..कृपा कर आणि असे काही करू नकोस "
आईला खूप समजावले आणि तिचे उपास कमी करून टाकले.. माझा देवावर विश्वास आहे..देव नक्कीच आहे..पण त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी उपासतापास करण्याची कल्पना मला पसंत नाही.
"या राशींना साडेसाती सुरू होत आहे...शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी अकरा शनिवार करा...मारूतीचे शनिचे दर्शन घ्या..तेल रूईचे पान व्हा.". यासारखे फंडे मला पटत नाहीत.
"मला सांगा ,कोणितरी तुमच्या डोक्यावर तेल ओततोय ,त्यात काळे उडीद घातलेत..तोंडाला गुळ लाऊन गळ्यात रूईच्या माळा घालतेय...त्यावर माश्या बसतात..तुम्ही आशीर्वाद द्याल..? "
सकाळची वेळ आहे...कोणीतरी दूध आणून डोक्यावर ओततोय..पाणि घालतेय.. बेल फुले वाहतेय..पुन्हा कोणीतरी ..येतंय...अखंड डोक्यावर पाण्याची धार पडतेय.अश्या परिस्थितीत तुम्ही काय कराल.?
देव अश्याने प्रसन्न होतो का? हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
देवाला प्रसन्न करण्या साठी अश्या बाह्योपचारांची गरज नाही..
मोठमोठ्याने स्तोत्रे म्हणून..लाऊडस्पीकर वरून पूजा सांगून सत्यनारायण प्रसन्न होत नाही..
पूजा आर्चा यावर विश्वास नसणारी मी नास्तिक आहे का? तर नाही मी पूर्णपणे आस्तिक आहे..देवावर माझा विश्वास आहे..
मुळात देव अध्यात्म ही फार वैयक्तिक बाब आहे..तिचे सामूहिकिरण करून त्याचा बाजार मांडू नये.
" मुळात मनात भाव पाहिजे ,
मनी नाही भाव ,
म्हणे देवा मला पाव?
असे अध्यात्म काय कामाचे? "
" राहूची पिडा टाळण्यासाठी राहूचा जप करा..तुम्हाला नसेल जमत तर आम्ही करतो..इतके हजार करावा लागतो..तुम्ही अकरा हजार रूपये द्या...बाकी आम्ही बघतो.."
"आता मला सांगा ,ह्यांनी राहूचा जप करून तो मला कसा प्रसन्न होईल? त्यांना मी अकरा हजार रूपये दिले तर फार फार तर तो त्यांना पावेल. .अशी माझी ठाम मते आजही आहेत.
" देव वगैरे असं काही नसतं. " असे देवाविषयी माझे प्रथम ठाम मत होते. आई बरोबर देवळात जात असे, घरात नियमित पूजा आर्चा होत असे..गणपती गौरी , झोकात साजरे होत..तयार झालेल्या पदार्थाचा पहिला घास देवाला नैवेद्य म्हणून जात असे. संध्याकाळी दिवाबत्ती होत असे..रामरक्षा , भीमरूपी..मनाचे श्लोक , पसायदान श्रध्देने म्हटलं जात असे.
शोध.. देवाच्या अस्तित्वाचा...1
.एकंदरीत वातावरण धार्मिक होते..जे जे आई ,दादा करायला सांगत ते आम्ही करत असू..
एकंदरीत वळण होते म्हणून करत गेले म्हणा..त्यात काही भाव नव्हता..देव काही करतो यापेक्षा माणसाच्या कर्तुत्वावर जास्त विश्वास होता...
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा फार मोठा पगडा होता..आजही आहे..सर्व धर्म समभाव , त्यांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी केलेले प्रयत्न..पतितपावन मंदिराची स्थापना ..देश हाच देव मानून त्याची केलेली सेवा..केलेले सर्वस्वाचे बलिदान ..हे सगळे मनावर खूप संस्कार करणारे होते.
शोध.. देवाच्या अस्तित्वाचा...1
लोकमान्यांनी लिहिलेले गीता रहस्य ..कर्मपर सिध्दांत , त्यांची देशसेवा या सर्वाचा फार मोठा संस्कार मनावर होता.
शोध.. देवाच्या अस्तित्वाचा...1
देश हा देव असे माझा ,
त्याची घडावी माझ्या हातून,
तेजोमय पूजा....हे पटत होते..
" देव देव्हार्यात नाही ,
देव नाही देवालयी ..देव तुमच्या आमच्यात आहे ...हे मनोमनी पटलं होते..
देव वगैरे असे काही असते तो सुख दुःख देतो घेतो असे काही नसते..हे मानण्याचे वय ..व तसा सस्कार होता.
जिथे भूमीचा पुत्र गाळील घाम
तिथे अन्न होऊन ठाकेल शाम
दिसे सावळे रूप त्याचे शिवारी!
शेतात राबणाऱ्या कष्टकऱ्यांच्या हातात परमेश्वर आहे ..तो निर्माण करणारा निर्माता आहे..याचा प्रत्यय आला होता.
नको मंत्र त्याला मुनीब्राह्मणाचे
तया आवडे गीत श्वासा-घणाचे
वसे तो सदा स्वेदगंगेकिनारी!
देव कष्टाने प्रसन्न होतो. "असेल हरि तर देईल खाटल्यावरी" यापेक्षा तुम्ही कष्ट करा त्याची सेवा करा..कष्टकऱ्यांच्या मागे तो उभा असतो..
तो मुरारी , श्याम , विठू प्रत्येकाच्या मागे उभा आहे याची खात्री होती.श्रमाचा संस्कार होता.
शिळा फोडती संघ पाथरवटांचे
कुणी कापसा रूप देती पटांचे
तयांच्या घरी नांदतो तो मुरारी!
जिथे काम तेथे उभा श्याम आहे
नव्हे धर्म रे घर्म ते रूप आहे
असे विश्वकर्मा श्रमांचा पुजारी!
शोध.. देवाच्या अस्तित्वाचा...1
तो विश्वकर्मा श्रमाचा पुजारी आहे .. हे सांगणारे.ग .दि .मा.आमचे आदर्श होते.
एकंदरित तारुण्यात जोम उत्साह , उमेदीच्या काळात देवळातील देवापेक्षा माणसातील देवावर जास्त विश्वास होता.
आई वडिलांचे संस्कार एकिकडे आणि आजूबाजूच्या विचारांचा , नव विचारांचा पगडा दुसरीकडे ..तळ्यात मळ्यात सारखी अवस्था होती..वेगवेगळ्या विचारांनी भारावलेले काहीसे गोंधळले पण होते..
देवापेक्षा कर्तुत्वावर विश्वास जास्त होता..
ते त्या वयानुरूप योग्यच होते...
आपले कामधाम सोडून वारीला जाणारे , देवासमोर रांगा लाऊन दर्शन घेणारे ..यज्ञयाग कर्मकांडात गुंतलेले लोक बघून एक सात्विक वेदना मनाला होत असे ..हे चूक आहे यावर ठाम विश्वास होता...
तरी सुध्दा घरातल्या संस्कारानुसार वर्तन होत असे..देवालयात गेल्यावर मनापासून हात जोडले जात असत..घरातील सणवार उत्सव त्यातील देवाची पूजा हवीहवीशी वाटत असे..नक्की देव आहे का? असाला तर कुठय? देव आहे मग अपघात, घातपात, अत्याचार का होतात? अनेक प्रश्न निर्माण होत..
ही एक अवस्था होती...
मला वाटते प्रत्येक जण या वैचारीक संघर्षातून जात असेल..
भोवती घडणाऱ्या घटना , घरातील संस्कार , शाळा ,समाज, वाचन ..कवी , लेखक या सगळ्यांचा प्रभाव संस्कार मनावर घडत होता...
देव नक्की आहे का? कुठय...हे प्रश्न अनुत्तरीतच होते.
कांदा मुळा भाजी , अवघी विठाई माझी हे पटले तरी मन देव्हार्यातही रमत होते..हे ही तितकेच खरे..
क्रमशः

169 

Share


Written by
धनश्री अजित जोशी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad