Bluepad | Bluepad
Bluepad
पुन्हा तेच वळण..
krutika_manohar
krutika_manohar
14th May, 2022

Share

आयुष्यात एकटेपणा जेव्हा आवडू लागतो
नेमकं तेव्हाच कुणीतरी सोबत करू पाहतो,
आणि नकळत जेव्हा त्या सोबतीत
मन रमू लागतं;
तेव्हा त्याच वळणावर आपण
पुन्हा जाऊन पोहचणार
हे ही सत्य तितकच अटळ असतं..
प्रसंगी जिथे स्वत:ची सावली देखील
स्वार्थी होऊन जाते,
मग निरंतर निस्वार्थ सोबतीची अपेक्षा ठेवणं
किती निरर्थक याचा प्रत्यक्ष प्रत्यय तिथे क्षणातच येतो..
मुळात अपेक्षा ठेवणंच चुकीचं
अगदी सहज आपण बोलतो;
पण मन आणि बुद्धाच्या त्या द्वंद्वात कधीसा तो,
मनाचाच पारडा मात्र अधिक अवजड होऊन जातो;
आणि सोडलेल्या त्याच वळणावर तो पुन्हा घेऊन जातो..
कृतिका...

175 

Share


krutika_manohar
Written by
krutika_manohar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad